
Venkatesh Iyer Longest Six: शुक्रवारी (29 मार्च) इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत (IPL 2024) दहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पाडला. या सामन्यात कोलकाताने 7 विकेट्सने विजय मिळवला. कोलकाताच्या विजयात वेंकटेश अय्यरने अर्धशतक करत मोलाचा वाटा उचलला.
या सामन्यात बेंगळुरूने कोलकातासमोर 183 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताकडून वेंकटेश अय्यरने 30 चेंडूत 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. या खेळीत त्याने 3 चौकार आणि 4 षटकार मारले.
दरम्यान, या चार षटकारांपैकी त्याचा एक षटकार आयपीएल 2024 मधील आत्तापर्यंतचा सर्वात लांब षटकार ठरला. हा षटकार त्याने मयंक डागरने गोलंदाजी केलेल्या 9 व्या षटकात मारला होता.
डागरने टाकलेल्या या षटकातील चौथ्या चेंडूवर अय्यरने डीप मीडविकेटवरून मोठा षटकार मारला. हा षटकार 106 मीटर लांब गेला.
त्यामुळे हा षटकार आयपीएल 2024 मधील सर्वात लांब षटकार ठरला. त्याच्याआधी हा विक्रम इशान किशनच्या नावावर होता. इशानने 27 मार्च रोजी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 103 मीटरचा षटकार मारला होता.
|
Virat Kohli In IPL: विराट सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्यांच्या यादीत टॉप-5 मध्ये; धोनी-गेल लाही टाकलं मागे |
यजमान संघाला हरवणारा कोलकाता पहिला संघ
दरम्यान, आयपीएल 2024 हंगामात प्रतिस्पर्धी संघाला त्यांच्या घरच्या मैदानात पराभूत करणारा कोलकाता पहिला संघ ठरला आहे. यापूर्वी यंदाच्या हंगामात झालेल्या नऊ सामन्यात घरच्या मैदानावर खेळणाऱ्या संघांनी विजय मिळवले होते.
कोलकाताचा विजय
कोलकाताकडून वेंकटेश अय्यर व्यतिरिक्त सुनील नारायणने 22 चेंडूत 47 धावांची खेळी केली. तसेच फिल सॉल्टने 20 चेंडूत 30 धावा केल्या, तर कर्णधार श्रेयस अय्यरने 24 चेंडूत नाबाद 39 धावा केल्या.
त्यामुळे बेंगळुरूने दिलेल्या 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग कोलकाताने 17 व्या षटकातच पूर्ण केला. बेंगळुरुकडून यश दयाल मयंक डागर आणि विजयकुमार वैशाख यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
तत्पुर्वी, बेंगळुरूकडून विराट कोहलीने 59 चेंडूत 83 धावांची नाबाद खेळी केली. त्यामुळे बेंगळुरूने 20 षटकात 6 बाद 182 धावा केल्या.
शहर
- मुंबई: अभिनेता इम्रान खानला मोठा दिलासा मिळणार का? देश सोडण्याच्या एफआरआरओच्या नोटिशीविरोधातील याचिकेवर २६ ऑक्टोबर रोजी होणार सुनावणी!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- नाशिक: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ६,५०० आदिवासी बांधव करणार महा गोदा आरती, विश्वविक्रमाची तयारी!
- छत्रपती संभाजीनगर: पक्ष पूर्ण बरबाद झाला अन् यांचा एल्गार चालू आहे; मंत्री संजय शिरसाट यांचा संजय राऊतांवर घणाघात, बंडखोर अब्दुल सतात्तरांनाही दिला सज्जड इशारा
महाराष्ट्र
- बीड: जातीपातीच्या जिवावर राज्य करू इच्छिणाऱ्या आणि मोठा होऊ पाहणाऱ्या नेत्याला भविष्यात कोणतेही स्थान नसते पंकजा मुंडे यांचा घणाघात
- अकोला: मिरवणुकीसाठी डीजेचे सेटिंग करताना विजेचा शॉक लागून तरुण जागीच ठार, तर ६ जण गंभीर जखमी
- नागपूर: आंदोलनाचे राजकारण नको, समस्यांवर उपाय शोधा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन!
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
गुन्हा
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: अभिजित दिपकेंना कोर्टाकडून मोठा दिलासा! तिरंगा मोर्चादरम्यान अटकेप्रकरणी जामीन मंजूर, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच होणार सुटका!
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!




























Subscribe to my channel




