बीड: श्रीक्षेत्र नारायणगडावर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बहुचर्चित दसरा मेळाव्यात एक अत्यंत मोठा आणि खळबळजनक गौप्यस्फोट करण्यात आला आहे. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी थेट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत, अडीच वर्षांपूर्वी शिजलेला एक मोठा कट उघड केला. "एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही भाजपच्या नेत्यांकडून माझ्या नावावर ५०० कोटी रुपये घेतले आहेत का? आणि ते मला दिल्याचा कानावर आलेला दावा खरा आहे की खोटं?" असा थेट सवाल करत जरांगे यांनी एकच राजकीय खळबळ उडवून दिली आहे.
दसरा मेळाव्यात ५०० कोटींचा गौप्यस्फोट:
नारायणगडाच्या पवित्र भूमीवरून सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका करताना मनोज जरांगे-पाटील म्हणाले की, काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात एक मोठी कुजबूज सुरू आहे. दिल्लीतील आणि महाराष्ट्रातील काही भाजप नेत्यांच्या अंतर्गत चर्चेचा हवाला देत त्यांनी दावा केला की, "एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या नेत्यांना असे सांगितले होते की, मनोज जरांगे-पाटील यांना देण्यासाठी म्हणून ५०० कोटी रुपयांची गरज आहे." एवढेच नव्हे तर, हे ५०० कोटी रुपये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचल्याची चर्चा असल्याचेही त्यांनी उघड केले.
जरांगे यांचे एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान:
या गंभीर आरोपांवर बोलताना जरांगे पुढे म्हणाले, "५०० कोटी हा काही लहान आकडा नाही. एवढ्या मोठ्या रकमेचा ढीग पाहिला तर दोन एकरच्या शेततळ्यात मावणार नाही एवढा मोठा होईल. मी माझ्या आयुष्यात अजून ५ हजारांचा नोटांचा गठ्ठा देखील पाहिलेला नाही. त्यामुळे शिंदे साहेब, तुम्ही माझ्या नावाने भाजपच्या नेत्यांकडून ५०० कोटी रुपये खोटे बोलून आणले का? आणि ते मला खरेच दिले का? या सर्व प्रकरणाचे नेमके सत्य काय आहे, हे आजच्या दसरा मेळाव्यात किंवा उद्यापर्यंत जनतेसमोर सांगावे."
भाजप आणि शिंदेंमध्ये चाललंय काय?
जर आपण माझ्यासाठी कोणतेही पैसे घेतले नसतील आणि हे सगळे जर खोटं असेल, तर दिलखुलासपणे सांगावे, असे आवाहन करत जरांगे म्हणाले की, "भाजप तुम्हाला राजकीयदृष्ट्या संपवत आहे की तुम्ही मला संपवण्याचा कट रचत आहात, याचा खरा छडा मी लावल्याशिवाय गप्प बसणार नाही." या मेळाव्यास नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज, नेकनूर येथील बंकटस्वामी महाराज मठाचे प्रमुख लक्ष्मण महाराज मेंगडे यांच्यासह राज्यभरातून आलेले लखो मराठा बांधव व वारकरी संप्रदायातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. जरांगे यांच्या या ५०० कोटींच्या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी उष्णता निर्माण झाली असून यावर आता सत्ताधाऱ्यांकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहर
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नागपूर: भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला नागपुरात काळाचा घाला! हिवरा बाजारची मंडई पाहून परतताना झालेल्या दोन भीषण अपघातांत तिघांचा मृत्यू
- मुंबई: प्रशासनाची बंदी झुगारून मुंबईच्या आकाशात रॉकेटची आतषबाजी; एकाच दिवसांत फटाक्यांमुळे तब्बल १३७ दुर्घटनांची नोंद!
- पुणे: दिवसाआड पाणी, मग कालव्यातून पाणी कुणासाठी? मनसेचे कालव्यात 'प्रतीकात्मक पोहण्याची स्पर्धा' घेत अनोखे व आक्रमक आंदोलन!
महाराष्ट्र
- पुणे: आदिवासी बांधवांसाठी दिलासादायक निर्णय! घरकुलांसाठी ८६३ भूमिहीनांना मिळाली जागा, १४ हजारांवर जणांना आधारकार्डचे वितरण; जनजातीय गौरव सेवा सप्ताहानिमित्त विशेष उपक्रम
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नागपूर: भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला नागपुरात काळाचा घाला! हिवरा बाजारची मंडई पाहून परतताना झालेल्या दोन भीषण अपघातांत तिघांचा मृत्यू
- मुंबई: प्रशासनाची बंदी झुगारून मुंबईच्या आकाशात रॉकेटची आतषबाजी; एकाच दिवसांत फटाक्यांमुळे तब्बल १३७ दुर्घटनांची नोंद!
गुन्हा
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!
- भोपाल: दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर तरुण चढला पाण्याच्या टाकीवर, भावांसमोरच खाली उडी मारत संपवले जीवन
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!
- उत्तर प्रदेश: भाऊबीजेच्या आनंदावर विरघळली दिवाळी; हरदोईतील गंगा एक्सप्रेसवेवर भीषण अपघातात पती-पत्नीसह दोन चिमुरड्यांचा मृत्यू, हसताखेळता परिवार उद्ध्वस्त!

























Subscribe to my channel




