
Mumbai : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम आता वेगाने सुरू होणार आहे. मुंबईतील भूमिगत भागांसाठी खोदकाम लवकरच सुरू होणार असल्यामुळे निश्चित वेळेत बुलेट ट्रेन मुंबईमध्ये सुरू होईल अशी अपेक्षा आहे. सोमवारी या भागाच्या खोदकामासाठी लागणारे दोन टनेल बोरिंग मशीन जवाहरलाल नेहरू बंदरात दाखल होणार आहे. अनेक कारणांमुळे चीनमध्ये मालवाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे अनेक महिन्यांपासून हे रखडले होते.
पहिला भाग 2025मध्येच दाखल
पहिल्या टनल बोरिंग मशीनचा काही भाग सप्टेंबर 2025मध्येच मुंबईत पोहचला होता. पण त्यानंतर मालवाहतूक प्रक्रियेतील अडचणींमुळे पुढील काम रखडले आणि मुंबईत खोदकाम सुरू करण्यात विलंब झाला. पण आता या फेरीत पहिल्या मशीनच्या उर्वरित भागांसह दुसऱ्या मशीनसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी मुंबईत येणार आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा माल मार्चच्या सुरुवातीला चीनमधून निघाला आणि चेन्नई बंदरात पोहचला. चेन्नईहून माल 18 मार्च रोजी मुंबईसाठी रवाना झाला असून सोमवारी, 23 मार्च रोजी दाखल होईल.
हे मशीन दाखल होताच त्यांची जोडणी आणि चाचणी करून सुमारे तीन महिन्यांमध्ये खोदकाम सुरू होईल अशी अपेक्षा आहे. वांद्रे-कुर्ला संकुल ते शिळफाटादरम्यान 20.37 किमी मार्ग भूमिगत असणार आहे. या भागाच्या खोदकामासाठी या मशीचा वापर करण्यात येणार आहे. शिवाय या मार्गावरील 7 किमी बोगदा ठाण्याच्या खाडीखालून जाणार आहे. हे खोदकाम सर्वात आव्हानात्मक ठरणार आहे.
कसा असेल मार्ग?
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन देशातील पहिली बुलेट ट्रेन असणार असून ताशी 320 किमी वेग असेल. मुंबईतील भुयारी बोगदे जमीनीखाली 25 ते 65 मीटर खोल असतील. शिळफाटा जवळ पार्सिक डोंगरांखाली हा बोगदा 114 मीटर खाली असेल. दरम्यान, वेळेत काम पूर्ण करण्यासाठी गरज पडल्यास तिसरी मशीनही आणण्याची योजना आहे. बीकेसी ते शिळफाटादरम्यान एकाच बोगद्यात अप आणि डाऊन हे रेल्वे मार्ग असतील.
मुंबई-अहमदाबात बुलेट ट्रेनचा मार्ग एकूण 508 किमी लांब असेल. यापैकी 97 किमी सूरत ते वापीदरम्यान मार्ग ऑगस्ट 2027मध्ये सुरू होणार आहे. यानंतर देशात आणखी 7 बुलेट ट्रेन प्रकल्प तयार करण्याची योजना आहे. यापैकी एक बुलेट ट्रेन मुंबई ते पुण्यादरम्यान बनणार आहे.
शहर
- मुंबई: महायुतीमधील पालकमंत्री पदाचा तिढा सुटला! रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले तर नाशिकची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे
- मुंबई: मिरा रोडमध्ये धावत्या स्कूल बसजवळ कोसळला मेट्रोचा स्लॅब, शाळकरी मुलं थोडक्यात बचावली
- पुणे: वाकड बनले कचऱ्याचे हब; चौधरी पार्क आणि यमुनानगर रोड परिसरातील नागरिक अस्वच्छतेमुळे त्रस्त
- नागपूर: वंदे मातरमचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई हवी; चंद्रशेखर बावनकुळे यांची आक्रमक मागणी
महाराष्ट्र
- मुंबई: महायुतीमधील पालकमंत्री पदाचा तिढा सुटला! रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले तर नाशिकची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे
- बीड: पहिल्या श्रावण सोमवारी व नागपंचमीच्या दुर्मिळ योगावर परळीच्या वैद्यनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; ३ हजार किलो फुलांची सजावट
- मुंबई: मिरा रोडमध्ये धावत्या स्कूल बसजवळ कोसळला मेट्रोचा स्लॅब, शाळकरी मुलं थोडक्यात बचावली
- पुणे: वाकड बनले कचऱ्याचे हब; चौधरी पार्क आणि यमुनानगर रोड परिसरातील नागरिक अस्वच्छतेमुळे त्रस्त
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोंदिया: स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! अंघोळीची हौस बेतली जिवावर, गोंदियातील ढासगड येथे दोन तरुण वाहून गेले
- लखनऊ: शिक्षणाचा खेळ; जेन-झीनंतर आता जेन-अल्फा आक्रमक; लखनऊमध्ये विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू


























Subscribe to my channel




