
Chandrapur Crime : शेतीच्या पैशांवरून झालेल्या किरकोळ वादातून एका मुलाने चक्क आपल्या आईवडिलांना घरात डांबून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. या घटनेमध्ये आईचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर वडील गंभीर जखमी आहेत. ही धक्कादायक घटना चंद्रपूरच्या कोरपना तालुक्यातील लोणी या गावात घडली. कमला सातपुते असे मृत वयोवृद्ध आईचे नाव आहे, तर पांडुरंग सातपुते असे गंभीर जखमी असलेल्या वृद्ध वडिलांचे नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. यातील मारेकरी मुलाला पोलिसांनी अटक केली असून मनोज पांडुरंग सातपुते (45) असे संशयित आरोपीचे नाव आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. मात्र जन्मदात्या वृद्ध आई-वाडिलांवर अशा पद्धतीने मारहाण केल्यामुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
|
Sugarcane FRP : शेतकऱ्यांसाठी खूशखबर! उसाच्या 'एफआरपी'त प्रतिटन 250 ने वाढ; मोदी सरकारचा मोठा निर्णय |
कोरपना तालुक्यातील लोणी या गावातील रहिवासी असेलेल्या पांडुरंग आणि त्यांच्या पत्नी कमला सातपुते यांना दोन मुले आहेत. या दोन्ही मुलांचे विवाह झाले असून, ते वेगवेगळे राहतात. सातपुते दाम्पत्याकडे 20 एकर जमीन आहे. या जमिनीच्या पैशांवरून मुलांमध्ये कायम वाद होत असल्याची प्रथमिक माहिती पुढे आली आहे. याच जमिनीच्या पैशाच्या वादातून मागील काही दिवसांपासून सातपुते कुटुंबामध्ये वाद होता. बुधवार, 21 फेब्रुवारीला त्यांच्यातील हा वाद विकोपाला गेला. त्यातून रागाच्या भरात मुलगा मनोजने आई कमला आणि वडील पांडुरंग यांना घरातील एका खोलीत डांबून त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केला. या घटनेमध्ये आई कमला यांना जबर मार लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर वडील पांडुरंग सातपुते हे देखील गंभीर जखमी झाले. नंतर ही बाब मनोजच्या वहिनीच्या लक्षात येताच त्यांना जबर धक्क बसला. सासू रक्ताच्या थारोळ्यात पडलेली बघून त्यांनी आरडा-ओरड सुरू केली असता मनोजने त्यांच्या मागे धावून त्यांचावर देखील प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, लपून बसल्याने त्यांचा जीव वाचला.
घटनेनंतर मनोजने घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान ही घटना शेजाऱ्यांना माहित होताच त्यांनी मदतीसाठी धाव घेतली आणि जखमी अवस्थेत पांडुरंग सातपुते यांना प्रथम कोरपना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले. दरम्यान कोरपना पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेत घडलेल्या प्रकरणाचा तपास सुरू केला, तसेच पळून गेलेला मुलगा मनोजचा शोध सुरू केला. अल्पावधीतच मनोजचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला अटक केली. घटनेचा पुढील तपास कोरपना पोलीस निरीक्षक संदीप एकाडे यांच्या मार्गदर्शनात कोरपना पोलीस करीत आहेत. मात्र या थरारक घटनेमुळे परिसरात एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहर
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
महाराष्ट्र
- ठाणे महापालिकेचा अजब कारभार: मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शिकवतायत गुजराती शिक्षक; माजी नगरसेवक अनिल भोर यांनी फोडले भांडं
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- धाराशिव जिल्हा परिषदेत दोन तास काळजाचा ठोका चुकला! लिफ्टमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्याची दोन तासांच्या थरारानंतर सुटका
गुन्हा
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
- छत्रपती संभाजीनगरमध्ये थरार: सासूसमोर सुनेची हत्या करणाऱ्या महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी; आर्थिक वादातून हत्या झाल्याचा संशय
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




