
Pune Crime News : फर्जी या बेवसिरीजप्रमाणे तीन तरुणांनी घरातच बनावट चलनी नोटा छापल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे. आयटी पार्क हिंजवडी परिसरात या बनावट चलनी नोटा घेऊन माण गावात जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले असून, या तिघांकडून 1 लाख 20 हजार रुपये किमतीच्या 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
घरातच या नोटा छापल्या पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, या नोटांची उत्कृष्ठ क्वॉलिटी पाहता यामध्ये परराज्य अथवा परदेशातील काही लोकांचा सहभाग आहे का हे पडताळून पाहिले जात आहे. शुक्रवारी (16 फेब्रुवारी) दुपारी बोडकेवाडी फाटा, माण हिंजवडी रोड येथे पोलीसांनी ही कारवाई केली. अभिषेक राजेंद्र काकडे (वय 20), ओंकार रामकृष्ण टेकम (वय 18, दोघे रा. हिंजवडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार श्रीकांत चव्हाण यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.
|
Fireworks Seized : चीनमधून आणलेले ११ कोटींचे फटाके जप्त, न्हावा शिवा येथे कस्टम विभागाची कारवाई |
यापूर्वी डिसेंबर 2022 मध्ये कुर्डुवाडीतील टेंभुर्णी चौकात ग्रामीण गुन्हे शाखेने चौघांना अटक केली होती. या लोकांनी उरळी देवाची येथून प्रिंटर मशिन व सामान आणून 500 रुपयांच्या 10 नोटा तयार केल्या होत्या. ऑक्टोबर 2022 मध्ये महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) बांगलादेशातून बनावट नोटांची तस्करी आणि तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना अटक केली होती. फेब्रुवारी 2024 मध्ये हिंजवडी पोलिसांनी दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडून 1 लाख 10 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. 12 ऑक्टोबर 2022 रोजी पुणे टेरिटोरियल युनिटच्या अधिकाऱ्यांनी तस्करीच्या भारतीय बनावट नोटा जप्त केल्या होत्या. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
कशा ओळखायच्या बनावट नोटा?
-वॉटरमार्क म्हणजे नोटेवरील चित्राची प्रतिकृती असून ती नोटेच्या दोन्ही बाजूला दिसते. वॉटरमार्क गहाळ असल्यास किंवा पोर्ट्रेटशी जुळत नसल्यास नोट बनावट असण्याची शक्यता असते.
-सर्व भारतीय नोटांमध्ये एक सुरक्षा धागा असतो जो नोटेच्या माध्यमातून उभा चालतो. प्रकाशासमोर ठेवल्यावर धागा स्पष्ट दिसतो आणि त्यावर नोटेचा भाव छापला जातो.
-सी-थ्रू रजिस्टर ही नोटेच्या डाव्या बाजूला असलेली एक छोटी खिडकी आहे. रजिस्टरमध्ये एक मूल्य क्रमांक छापलेला असतो, जो नोटेच्या दोन्ही बाजूंनी पाहता येतो. रजिस्टर गहाळ असेल किंवा योग्य आकडा नसेल तर नोट बनावट असण्याची शक्यता असते.
शहर
- नागपूर: टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम..नागपुरात बनावट नोटा आणि ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा गुन्हेगारांना थेट इशारा!
- मुंबई: "भिकाऱ्यासारखी भीक मागत आहेत" वित्त खात्याच्या मागणीवरून संजय राऊतांचे अजित पवार गटावर अत्यंत खालच्या पातळीवर टीकास्त्र; राजकीय वर्तुळात खळबळ!
- नाशिक: "राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ" सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संत-महंतांशी संवाद; बाधितांच्या पुनर्वसनाची दिली मोठी हमी!
- नाशिक: गोदाकाठी विश्वविक्रमी शंखनाद; ५१७ जणांनी एकाच वेळी शंख फुंकत नाशिकमध्ये मोडला अमेरिकेचा जुना विक्रम!
महाराष्ट्र
- नागपूर: टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम..नागपुरात बनावट नोटा आणि ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा गुन्हेगारांना थेट इशारा!
- धुळे: पुणे थेट रेल्वे सेवा लवकरच सुरू होणार का? माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेत मांडली अत्यंत महत्त्वाची मागणी!
- चंद्रपूर: ना हार्ड कॉपी, ना कार्यालयाचे खेटे; आता जात प्रमाणपत्र पडताळणी होणार पूर्णत: पेपरलेस, विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठी पायपीट वाचणार!
- मुंबई: "भिकाऱ्यासारखी भीक मागत आहेत" वित्त खात्याच्या मागणीवरून संजय राऊतांचे अजित पवार गटावर अत्यंत खालच्या पातळीवर टीकास्त्र; राजकीय वर्तुळात खळबळ!
गुन्हा
- पुणे: भरवस्तीत तरुणीला बळच उचलून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ, संतापलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून दिला पोलिसांच्या हातांत
- रत्नागिरी: लांजा तालुक्यात खळबळ! घरात एकट्या असलेल्या वृद्धेचा संशयास्पद मृत्यू, हातातील सोन्याच्या बांगड्या बळजबरीने चोरल्याने मोठी सनसनाटी
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: भाजपने पक्षातील निष्ठावानांची कदर करावी; मगोप नेते सुदिन ढवळीकर यांचा मित्रपक्षाला मोलाचा सल्ला
- नवी दिल्ली: दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र; रामलळा मैदानातील रॅली पुढे ढकलण्याची मागणी, १०,००० कोटी रुपयांच्या नुकसानीचा इशारा
- नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एसआयआरविरोधातील आंदोलने अधिक तीव्र १४५ संघटनांचे एकत्र येऊन निवडणूक आयोगावर धडक मोर्चा, राकेश टिकैतही मैदानात
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!



























Subscribe to my channel




