
Mumbai Crime News : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावे आमदारांना परदेश वारी घडवणाऱ्या कंपनीकडे दोघा तोतयांनी पैसे मागीतल्याने खळबळ उडाली आहे. घटना उघडकीस आल्यानंतर दोघा अज्ञातांविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांने प्रसंगावधान दाखवल्यामुळे फसवणूक टळली आहे, मात्र चक्क विधानसभा अध्यक्षांच्या नावावेच फसवणुकीचा प्रकार घडल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा आणि विधानपरिषद आमदारांना परदेश वारी घडवण्याचे कंत्राट एका टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीला देण्यात आलेले आहे. दरम्यान या कंपनीच्या कार्यालयात भर दुपारी ३ वाजता दोघं अचानक शिरले. या दोन्ही आरोपींनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावाने पैशांची मागणी केली. तसेच त्यांना खात्री पटावी यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याशी फोनवरून संवाद साधून देण्याचे नाटकही केले. धक्कादायक बाब म्हणजे फोनवरून एका तोतया इसमाने नार्वेकर यांच्या नावाने कर्मचाऱ्याशी संवादही साधला.
मात्र या प्रकरणात काहीतरी काळबेरं असल्याचा संशय आल्याने कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी दोन्ही आरोपींनी कर्मचाऱ्यास धमकी देऊन तिथून पळ काढला. हा सर्व प्रकार नार्वेकर यांच्या कानावर पडताच त्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली. तसेच त्यांच्या स्विय सहाय्यकाकडून तात्काळ मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: वाकड बनले कचऱ्याचे हब; चौधरी पार्क आणि यमुनानगर रोड परिसरातील नागरिक अस्वच्छतेमुळे त्रस्त
- नागपूर: वंदे मातरमचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई हवी; चंद्रशेखर बावनकुळे यांची आक्रमक मागणी
- पुणे: मोशी दुर्घटनेवरून भाजप आणि राष्ट्रवादीत कलगीतुरा; आमदार रोहित पवार यांच्या टीकेला भाजपचे नेते प्रशांत शितोळे यांचे जोरदार प्रत्युत्तर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
महाराष्ट्र
- पुणे: वाकड बनले कचऱ्याचे हब; चौधरी पार्क आणि यमुनानगर रोड परिसरातील नागरिक अस्वच्छतेमुळे त्रस्त
- नागपूर: वंदे मातरमचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई हवी; चंद्रशेखर बावनकुळे यांची आक्रमक मागणी
- पुणे: मोशी दुर्घटनेवरून भाजप आणि राष्ट्रवादीत कलगीतुरा; आमदार रोहित पवार यांच्या टीकेला भाजपचे नेते प्रशांत शितोळे यांचे जोरदार प्रत्युत्तर
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

नांदेडमध्ये तृतीयपंथीयांच्या दोन गटांत जोरदार हाणामारी; व्हिडिओ व्हायरल
हरिद्वारमध्ये ‘रोड रेज’; हळू चालवण्यास सांगितल्याने थार चालकाचा संताप, बसचालकाला धडक
क्रोएशियाच्या ओमीशमध्ये भीषण वणवा; आगीच्या ज्वाळांनी आकाश लाल, हजारो नागरिकांचे स्थलांतर
देश विदेश
- गोंदिया: स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! अंघोळीची हौस बेतली जिवावर, गोंदियातील ढासगड येथे दोन तरुण वाहून गेले
- लखनऊ: शिक्षणाचा खेळ; जेन-झीनंतर आता जेन-अल्फा आक्रमक; लखनऊमध्ये विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू



























Subscribe to my channel




