
Manoj Jarange Morcha : मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि त्यांचे समर्थक आज मुंबईत पोहोचणार आहे. काल पुणे शहर ओलांडण्यासाठी त्यांना १२ तासांपेक्षा जास्त वेळ लागला होता. त्यामुळं बुधवारी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये वाहतूक कोंडी झाली होती. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत.
आज वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी मोर्चा आयोजकांनी त्यांच्या मार्गात बदल केला आहे, अशी माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक (एसपी) सोमनाथ घार्गे यांनी दिली.
आता मराठा आंदोलक आणि त्यांची वाहने NH48 या जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून प्रवास करणार आहे. त्यानंतर ते शेडुंग टोल प्लाझापर्यंत पोहोचणार आहेत. गुरुवारी सकाळी ते कळंबोलीत न येता गव्हाण फाटा ओलांडून सायंकाळी पाम बीच रोडने बेलापूर जंक्शन येथे पोहोचणार आहे. मनोज जरांगे आणि त्यांचे समर्थक शुक्रवारी एपीएमसी परिसरात रात्र काढणार आहेत. शुक्रवारी मुंबईतील आझाद मैदानातून ते मोर्चाला सुरुवात करणार आहेत.
आज कोल्हापूर, पुणे आणि अहमदनगर येथून मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचा वापर करण्यास परवानगी दिली जाणार नाही. मोर्चा एक्स्प्रेसवे ऐवजी मुंबई-पुणे महामार्गाचा वापर करणार आहे. खंडाळा घाट विभागात 6 किमीचा रस्ता आहे, या मार्गावर दोन्ही बाजुने वाहतुक सुरू असणार आहे, असं एचएसपी पुणे युनिटच्या एसपी लता फड यांनी सांगितलं आहे.
|
Prakash Shendge : अन्यथा ओबीसी समाजाचाही २६ तारखेला मुंबईत मोर्चा; प्रकाश शेंडगे यांचा सरकारला इशारा |
कोल्हापूर, पुणे आणि अहमदनगर येथून येणारी अवजड वाहने ई-वेच्या आधी वेगवेगळ्या ठिकाणी थांबवली जातील. मोर्चा खंडाळा घाटातून पुढे गेल्यानंतर वाहनांना टप्प्याटप्प्याने पुढे जाण्यास परवानगी दिली जाणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. एक्स्प्रेसवेचा पुण्याकडे जाणारा कॉरिडॉर अवजड वाहनांसाठी खुला असणार आहे.
दोन्हीकडून येणाऱ्या हलक्या मोटार वाहनांच्या वाहतुकीवर कोणतंही बंधन नसेल. खंडाळ्याच्या बाहेर मुंबई-पुणे महामार्गाकडे बॅरिकेड्स लावले जाणार आहेत. अवजड वाहनांना परवानगी दिली जाणार नाही, असं सहाय्यक निरीक्षक सुमैया बागवान यांनी सांगितलं आहे.
शहर
- मुंबई: केडीएमसी रुग्णालयाचा भोंगळ कारभार फ्रॅक्चर झालेल्या पायाला प्लास्टरऐवजी लावला पुठ्ठा, कर्मचाऱ्यांची पैशांची मागणी
- अमरावती: विद्यापीठात १३ असोसिएट प्रोफेसर पदांसाठी तब्बल १८७ अर्ज; राज्यासह देशभरातील उच्चशिक्षित उमेदवार तीव्र स्पर्धेत!
- नाशिक: 'महासिंहस्था' ची जय्यत तयारी; ३४ हजार कोटींच्या निधीतून कुंभमेळा होणार 'न भूतो न भविष्यती
- पुणे: मोशी दुर्घटनेने उद्ध्वस्त झाले कुटुंब, कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली पतीचा मृत्यू, काही आठवड्यांतच पत्नीनेही संपवले जीवन; २ चिमुकल्या मुली पूर्णपणे पोरक्या!
महाराष्ट्र
- जळगाव: भोळा राहिलो तर हे भाजपवाले खाऊन जातील; गिरीश महाजनांसमोरच गुलाबराव पाटलांचा भाजपवर खोचक टोला
- महाराष्ट्र: गेल्या पाच वर्षांत ३६ हजार कंपन्या बंद झाल्याचा विरोधकांचा आरोप; मात्र थेट परकीय गुंतवणुकीत (FDI) राज्य अजूनही अव्वल!
- अमरावती: विद्यापीठात १३ असोसिएट प्रोफेसर पदांसाठी तब्बल १८७ अर्ज; राज्यासह देशभरातील उच्चशिक्षित उमेदवार तीव्र स्पर्धेत!
- नाशिक: 'महासिंहस्था' ची जय्यत तयारी; ३४ हजार कोटींच्या निधीतून कुंभमेळा होणार 'न भूतो न भविष्यती
गुन्हा
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
- नागपूर: "इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली काळ; १६ वर्षीय मुलीला ओलीस ठेवून अमानवीय अत्याचार; नराधम अटकेत."
- पुणे: १० वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधम झुंबर खोमणे याला जेजुरी पोलिसांकडून बेड्या
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: लोकशाही जिवंत ठेवण्याची आपली जबाबदारी आहे; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादावर सरन्यायाधीशांचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
- बांगलादेश: आता फक्त भारतच वाचवू शकतो का? रात्री ८ वाजताच दिवे बंद करण्याची वेळ का आली? नेमकं काय घडलं
- उत्तर प्रदेश: केस गळतीच्या गंभीर समस्येमुळे आणि उपचारांनंतरही फरक न पडल्याने १५ वर्षीय मुलीचे टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन!
- नवी दिल्ली: राज्यसभेत मोठा गदारोळ रामलिला मैदानावर झालेल्या 'शुद्धीकरण' हवन प्रकरणावरून मल्लिकार्जुन खर्गे यांचे भाजपवर जोरदार प्रहार!




























Subscribe to my channel




