Accident News : पुणे-नाशिक महामार्गावर जीपची ट्रकला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, ५ जण गंभीर जखमी

Accident News : पुणे-नाशिक महामार्गावर अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. ट्रक आणि जीपमध्ये झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मंचरजवळ भल्या पहाटे हा भीषण अपघात झाला आहे. नाशिकवरुन भोसरीच्या दिशेने जात असताना जीपने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की जीपच्या पुढील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. दाट धुकं असल्याने समोरील ट्रकचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे.

Manoj Jarange : जालन्यातील सभेपूर्वी मनोज जरांगेंचं महाराष्ट्रातील मराठ्यांना महत्त्वाचे आवाहन; म्हणाले...

अपघातात जीपमधील एकच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर ५ जण जखमी असून त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. जखमींमधील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देखील समोर आहेत.


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *