
Sharad Pawar : पाऊस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे वेगळंच नातं आहे. असं म्हटलं जातंय की पाऊस हा शरद पवारांसाठी लकी ठरतो. साताऱ्यातील शरद पवारांच्या सभेनंतर निवडणुकीचं चित्र पालटल्याचं अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं. आताही राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार पहिल्यांदाच नवी मुंबईमध्ये एनसीपीच्या महिला बचत गटाच्या मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते अन् त्या ठिकाणीही पाऊस बसरला. शरद पवारांनीही भर पावसात सभेला संबोधित केलं.
साताऱ्यातील सभेची आठवण
या आधी शरद पवारांनी विधानसभा निवडणूक आणि सातारा पोटनिवडणुकीच्या वेळी साताऱ्यात जाहीर सभा घेतली होती. पवारांच्या सभेच्या वेळी धो-धो पाऊस कोसळत होता. पण पक्षाचे उमेदवार म्हणून श्रीनिवास पाटील हे होते. ते शरद पवारांचे मित्र आणि त्यांच्या राजकारणातील सुरूवातीपासूनचे सोबती. त्यांच्यासाठी शरद पवारांनी भर पावसात सभा घेतली आणि संबोधित केलं.
|
|
शरद पवार पावसात भिजले पण त्यांच्यावर फक्त पावसानेच नव्हे तर मतदारांनीही मतांचा वर्षाव केला आणि उदयनराजेंना पाडून श्रीनिवास पाटील खासदार झाले. त्यामुळे शरद पवारांची ती पावसातील सभा मात्र महाराष्ट्राच्या कायमच लक्षात राहिली.
आताही नवी मुंबईत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला बचत गटाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. शरद पवार येताच पाऊस सुरू झाला. समोर मोठा जनसमूदाय असल्याने पवारांनी हा कार्यक्रम रद्द न करता कायम करण्याची सूचना केली. पावसाची स्थिती पाहता पवारांनी थेट मुख्य कार्यक्रमाला सुरूवात केली आणि भर पावसातच कार्यकर्त्यांना संबोधित केलं. पाऊस हा शरद पवारांच्यासाठी लकी ठरणारा असल्याचं सांगत साताऱ्याप्रमाणे नवी मुंबईची जनताही आता शरद पवारांच्या पाठिशी राहणार असल्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली.
कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
अनेक वर्षांनंतर शरद पवार कल्याणमध्ये आल्याने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच उत्साह दिसून आला. राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांच्या निवासस्थानी शरद पवार यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर पत्रिपुल येथे जेसीबीने शरद पवार यांच्या ताफ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर शरद पवार जिल्हाध्यक्ष वंडार पाटील यांच्या निवासस्थानी गेले.
शहर
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
महाराष्ट्र
- ठाणे महापालिकेचा अजब कारभार: मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शिकवतायत गुजराती शिक्षक; माजी नगरसेवक अनिल भोर यांनी फोडले भांडं
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- धाराशिव जिल्हा परिषदेत दोन तास काळजाचा ठोका चुकला! लिफ्टमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्याची दोन तासांच्या थरारानंतर सुटका
गुन्हा
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
- छत्रपती संभाजीनगरमध्ये थरार: सासूसमोर सुनेची हत्या करणाऱ्या महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी; आर्थिक वादातून हत्या झाल्याचा संशय
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




