
Ratnagiri News: रत्नागिरीतील गणपतीपुळे समुद्रकिनारी आलेल्या बेबी व्हेल माशाचा अखेर मृत्यू झाला आहे. व्हेल माशाच्या पिल्लाला दोन दिवसांत जवळपास पाच वेळा वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. दूर समुद्रात सोडलेला बेबी व्हेल 15 नोव्हेंबरला संध्याकाळी पुन्हा समुद्रकिनारी आला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, हा बेबी व्हेल 13 नोव्हेंबर रोजी सकाळी पहिल्यांदा निदर्शनास आला होता.
खोल समुद्रातील बेबी व्हेल भरकटला आणि रत्नागिरीतील गणपतीपुळेच्या समुद्रकिनाऱ्यावर आला. ज्या पाण्यासोबत तो आला ते पाणी ओहोटीमुळे माघारी फिरलं, मात्र व्हेल माशाचं हे पिल्लू तिथेच अडकून पडलं. अवाढव्य वेबी व्हेलला पुन्हा समुद्रात लोटण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. पण फक्त प्रयत्न नाहीतर प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागत होती. बेबी व्हेलला अथांग समुद्रातील त्याच्या घरच्या वाटेपर्यंत सोडण्यासाठी अनेक अडथळे येत होते. माशाला समुद्रात सोडण्यासाठीचे स्थानिकांसह प्रशासनाचे प्रयत्न आणि जगण्यासाठीची माशाची धडपड तब्बल 40 तास सुरू होती. अखेर 40 तासांनंतर अखेर या प्रयत्नांना यशही आलं होतं. पण काय झालं, कुणालाच नाही कळलं आणि पुन्हा एकदा बेबी व्हेल किनाऱ्यावर आला. किनाऱ्यावर आला आणि अखेर त्यानं मृत्यूसमोर हात टेकत आपला जीव सोडला.
|
|
प्रशासनाकडून बेबी व्हेलला वाचवण्याचे अथक प्रयत्न अयशस्वी
व्हेल मासा जेव्हा बांगडा किंवा तारली, माकूळ यांचा पाठलाग करत असतील तर ते किनाऱ्याकडे येऊ शकतात. असा पाठलाग करत असताना ओहोटी सुरु झाली तर ते किनाऱ्यावरील वाळूत अडकून पडू शकतात. त्यांच्या महाकाय शरीराचा भार ते पाण्यात असताना सहज पेलू शकतात. पण पाण्याबाहेर त्यांच्या वजनामुळेच त्यांची इंद्रिये दबली जातात. त्यांची त्वचा सुकू लागली की त्याखालील चरबीच्या थरामुळे शरीरात खूप उष्णता निर्माण होते आणि अतिउष्णतेमुळे डिहायड्रेशन होऊन ते मृत होतात. अशावेळी गणपतीपुळेच्या समुद्रकिनाऱ्यावर अडकून पडलेल्या व्हेलच्या पिल्लाला महत्वाचा धोका होता. त्याच्या त्वचेखालील चरबीच्या थराचं तापमान पाण्याबाहेर प्रचंड वाढून, त्वचा सुकून जाण्याचा. यामुळे शरीराचे अंतर्गत तापमानही खूप वाढतं आणि डिहायड्रेशन होऊन माशाचा मृत होण्याचा धोका अधिक होता. पण त्याची त्वचा सतत पाणी टाकून ओली ठेवल्यानं हा धोका कमी करता आला. तसेच, पशुवैद्यकीय डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक उपचारांचाही बेबी व्हेलला उपयोग झाला. त्यामुळेच तो एवढे दिवस किनाऱ्यावर तग धरू शकला.
बेबी व्हेल जन्मापासून तीन महिने आईच्या दुधावर जगतो
साधारणपणे तीन वर्ष व्हेल माशाचं पिल्लू आईच्या दुधावर वाढतं. समुद्रात परत सोडल्यावरही त्याला त्याची आई भेटणं महत्वाचं होतं. बेबी व्हेल जन्माला आल्यानंतर लगेच दूध पिण्यास सुरुवात करतं. बेबी व्हेलमधील गंध ज्ञान यामुळे, आपल्या आईला दुधाची भूक लागल्यावर कुठे स्पर्श करायचा याचं त्यांना उपजतच ज्ञान असतं. आईमध्ये असणाऱ्या मॅमरी स्लिट्स खाली असणाऱ्या स्तनाग्रांमधून दूध स्त्रवतं आणि पिल्लाच्या तोंडाजवळ दूध फवारलं जातं. हे पाण्यामध्ये फवारलं गेलेलं दूध पिल्लू पितं.
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली





























Subscribe to my channel




