Bhandara Accident : माय-लेकाची भेट अपूर्णच राहिली, गावी निघालेल्या तरुणाचा वाटेतच अपघाती मृत्यू

Bhandara Accident : भंडारा जिल्ह्यात एक भीषण अपघात घडला आहे. दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबाला आदळल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय. सध्या जखमींवर जवळच्या रुग्णालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, भंडारा जिल्हा मोहाडी तालुक्यातील रामटेक-तुमसर राष्ट्रीय महामार्गावर सालई शिवारात हा अपघात घडला आहे. अपघात इतका भीषण होता की दुचाकीच्या पुढील भागाचा चक्काचूर झालाय. दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबावर आदळली त्यामुळे दोन्ही तरुण हवेत फेकले गेले. यातील एक तरुण सुदैवाने बचावला असून तो गंभीर जखमी आहे.

Rain Forecast : राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय; आज विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; 23 जिल्ह्यांना यलो अलर्ट

हा अपघात सालई गाव शिवारात रात्री ८.३० च्या सुमारास घडला. मृतक तरुणाचे नाव शुभम प्रकाश भोयर (वय २५ वर्षे) राहणार बाम्हणी असे आहे. तर गंभीर जखमी तरुणाचे नाव मयूर प्रल्हाद भोयर (वय २४ वर्षे) राहणार बाम्हनी असे आहे. अपघाती निधन झाल्याने तरुणाच्या घरावर शोककळा पसरलीये. मुलगा घरी येणार म्हणून आई वाट पाहत होती मात्र या धक्कादयक घटनेमुळे आईने टाहो फोडलाय.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *