डोंबिवली (जि. ठाणे): डोंबिवली जवळच्या ग्रामीण परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि चीड आणणारी घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादानंतर घरातून निघून आलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या हतबलतेचा गैरफायदा घेत तिला नोकरी आणि राहण्यासाठी खोली (रूम) देण्याचे आमिष दाखवून तिघांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी तत्परता दाखवत मुख्य आरोपी चायनीज हॉटेल चालकासह त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.
नेमकी घटना कशी घडली? मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी काही दिवसांपूर्वी घरात वाद झाल्याने राहते घर सोडून निघून गेली होती. कटाई-बदलापूर पाईपलाईन रोडवरील एका चायनीज हॉटेलमध्ये ती अन्नाच्या शोधात गेली असता तिच्याकडे पैसे नव्हते. तिची हतबलता पाहून हॉटेल चालक अंगूर ठाकूर (वय २२) याने तिला मदतीचे आमिष दाखवून विश्वासात घेतले.
त्यानंतर त्याने तिची ओळख परिसरातील अन्य दोन अल्पवयीन मुलांशी करून दिली. मुलीने स्वतःची अडचण सांगताच, या तिघांनी तिला कामाची सोय आणि राहण्यासाठी रूम देण्याचे आमिष दाखवून एका निर्जन ठिकाणी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. या क्रूर कृत्यानंतर आरोपी मुलीला सोडून पसार झाले.
सुटका अन् पोलिसांची वेगाने कारवाई: अत्याचारानंतर पीडित मुलगी कशीबशी चालत कुळगाव-बदलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोहोचली. तिची दयनीय अवस्था पाहून स्थानिक रहिवाशांनी विचारपूस केली असता हा संतापजनक प्रकार उघडकीस आला. जागृत नागरिकांनी तिला तातडीने पोलिसांच्या स्वाधीन केले.
दरम्यान, मुलीच्या पालकांनी आधीच मानपाडा पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता (अपहरण) झाल्याची तक्रार नोंदवली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी तिन्ही आरोपींना निष्पन्न करून ताब्यात घेतले. मुख्य आरोपी अंगूर ठाकूर याला कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे, तर इतर दोन आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी भिवंडी येथील बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
शहर
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
महाराष्ट्र
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
गुन्हा
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप

























Subscribe to my channel




