
Amravati Crime News : अमरावती जिल्ह्यातील मोर्शी शहरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. चारित्र्यावरील संशयातून एका मुलाने आपल्या आईसह भावाची निर्घृणपणे हत्या केली. तब्बल ८ दिवसानंतर ही घटना उघडकीस आली. हत्येनंतर आरोपी मुलगा हैदराबाद येथे लपून बसला होता. पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवत त्याला अटक केली आहे.
सौरभ गणेश कापसे (वय २०, वर्ष) असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. तर नीलिमा गणेश कापसे (वय ४८ वर्ष) आणि आयुष गणेश कापसे (वय १८ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांना १ ऑगस्टला सौरभची आई व लहान भावाचे मृतदेह आढळले होते.
त्याचवेळीपासून सौरभ बेपत्ता होता व त्याचा मोबाईल बंद होता, तसेच मृतांचे मोबाइल सुध्दा गायब होते. मिळालेल्या माहितीनुसार, सौरभच्या वडिलांचा आठ वर्षांपूर्वी मृत्यू झाल्यानंतर त्याची आई दोन मुलांसह राहत होती. सौरभ व त्याच्या आईमध्ये वाद व्हायचे.
दरम्यान, सौरभला त्याच्या आईच्या चारित्र्यावरही संशय होता. यातूनच त्याने आई व लहान भावाचा खून करायचे ठरवले. यासाठी मागील ४ ते ५ महिन्यांपासून तो सातत्याने इंटरनेटवर खून कसा करावा, कोणत्या पध्दतीने करावा यासाठी विविध पद्धतींचा अभ्यास करत होता.
वैद्यकीय ज्ञान बऱ्यापैकी असल्यामुळे त्याने यूट्यूबवर त्याबाबत माहिती घेतली. आरोपी सौरभ याने आई आणि भावाला संपवण्यासाठी प्लान आखला. त्याने जेवणातील भाजीमध्ये धोत्र्याच्या बिया टाकल्या. ही भाजी खाताच त्याच्या आई आणि भावाची तब्येत खराब झाली. त्यानंतर सलाईन लावण्याच्या बहाण्याने आरोपीने दोघांनाही गुंगीचं औषध दिलं.
सलाईनमध्ये गुंगीच्या औषधाचा अतिडोस दिल्याने दोघांचाही झोपेतच मृत्यू झाला. दोघांचाही मृत्यू झाल्याची खात्री होताच त्याने मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळून घरातील बेडमध्ये लपवून ठेवले.
त्यानंतर घराला बाहेरून कुलूप लावून तो घर सोडून निघून गेला. ८ दिवसानंतर दुर्गंधी पसरत असल्याने पोलिसांच्या मदतीने घर उघडण्यात आले. त्यावेळी ही घटना उघडकीस आली. दरम्यान, पोलिसांनी फरार असलेल्या आरोपी सौरभचा शोध घेतला. यावेळी सौरभ हैदराबाद येथे असल्याचं पोलिसांना कळालं.
पोलिसांचं एक पथक तातडीने हैदराबादला रवाना झालं. त्यानंतर आरोपी सौरभला अटक करण्यात आली. आता त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. कौटुंबिक वादातून मुलाने आईसह भावाची हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
शहर
- नागपूर: वंदे मातरमचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई हवी; चंद्रशेखर बावनकुळे यांची आक्रमक मागणी
- पुणे: मोशी दुर्घटनेवरून भाजप आणि राष्ट्रवादीत कलगीतुरा; आमदार रोहित पवार यांच्या टीकेला भाजपचे नेते प्रशांत शितोळे यांचे जोरदार प्रत्युत्तर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
महाराष्ट्र
- नागपूर: वंदे मातरमचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई हवी; चंद्रशेखर बावनकुळे यांची आक्रमक मागणी
- पुणे: मोशी दुर्घटनेवरून भाजप आणि राष्ट्रवादीत कलगीतुरा; आमदार रोहित पवार यांच्या टीकेला भाजपचे नेते प्रशांत शितोळे यांचे जोरदार प्रत्युत्तर
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- लखनऊ: शिक्षणाचा खेळ; जेन-झीनंतर आता जेन-अल्फा आक्रमक; लखनऊमध्ये विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप


























Subscribe to my channel




