Pune Crime : राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची हत्या, दोघे पाेलिसांच्या ताब्यात

Jejuri  : पुरंदर तालुक्यातील जेजुरी नगर पालिकेचे माजी नगरसेवक महबूब पानसरे यांच्या हत्या प्रकरणी जेजुरी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर जेजुरी पोलीस ठाण्यात राजु फिरोज पानसरे यांनी फिर्यादी दिली हाेती. त्यानूसार पाेलिसांवर दाेघांवर कारवाई केली आहे. 

राजु फिरोज पानसरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार  मेहबूब पानसरे यांच्यावर हल्ला करण्यामध्ये वणेश प्रल्हाद परदेशी, किरण वणेश परदेशी, स्वामी वणेश परदेशी, काका परदेशी व लाल शर्ट घातलेला अनोळखी व्यक्तींचा जणांचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

यामध्ये फिर्यादी फिरोज पानसरे याच्यासह साजिद युनुस मुलाणी हा देखील जखमी झाल्याचे म्हटलं आहे. पाेलिसांनी चाैकशीअंती दोन संशियतांना ताब्यात घेतले आहे. मेहबूब पानसरे यांच्यावर कुऱ्हाड आणि पहारिने वार करण्यात आल्याची माहिती फिर्यादीत नमूद करण्यात आली आहे. पाेलिस अन्य संशयितांचा शोध घेताहेत अशी माहिती जेजुरी पोलिस ठाण्यातून देण्यात आली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *