
NCP Former Nagarsevak Killed: जेजुरी नगरपरिषदेचे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक महेबुब पानसरे यांच्यावर चार ते पाच जणांनी कोयता आणि कुऱ्हाडीने सपासप वार केले. या घटनेत पानसरे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी पुणे येथील रुग्णआलयात दाखल करण्यात आलं असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
वनेश प्रल्हाद परदेशी, किरण वनेश परदेशी, स्वामी वनेश परदेशी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. शेतजमिनीच्या वादातून पानसरे यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेहबूब पानसरे यांची नाझरे धरण परिसरात शेती आहे. या शेतात ट्रॅक्टरद्वारे शेतीची मशागत सुरु होती. मेहबूब पानसरे आणि त्यांच्याबरोबर इतर तिघेजण हे शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शेतातील मशागतीचे काम पाहण्यासाठी गेले होते.
यावेळी वनेश परदेशी यांचे मेहबूब पानसरे यांच्यात शेतजमिनीच्या जुन्या वादाच्या कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला, की यावेळी वनेश परदेशी त्यांची दोन मुले, इतर पाच जणांनी मेहबूब पानसरे आणि इतर दोघांवर कुऱ्हाड आणि कोयत्याने वार केले, यात तिघे जण जखमी झाले.
दरम्यान, मेहबुब शेख यांना तातडीने उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, शरीरावर घाव जास्त असल्याने अतिरक्तस्त्रावाने त्यांचा मृत्यू झाला. महेबुब पानसरे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे जवळचे समजले जातात. त्यांची हत्या करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




