Rajya Sabha Election 2026 Mahayuti Candidate Name List : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. आमदारांच्या संख्याबळानुसार, महायुतीला ६ तर मविआला फक्त एक जागा मिळणार आहे. राज्यसभेची खासदारकी मिळवण्यासाठी नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. महायुतीच्या वाट्यातील ६ जागांपैकी ४ जागा भाजपला मिळणार आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंच्या शिवसेनेला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. महायुतीकडून ६ जागांसाठी कोणाची निवड केली जाणार? यावर राजकीय चर्चा सुरू आहे. महायुतीच्या ३ उमेदवारांची नावे जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. कोणत्या ३ नेत्यांना संधी दिली जाणार आहे? त्याबाबत जाणून घेऊयात...राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवारांना संधीअजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. त्यामध्ये सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली, तर पार्थ पवार यांची राज्यसभेसाठी निवड करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर सुनेत्रा पवार या राज्याच्या राजकारणात सक्रिय झाल्या. आता दिल्लीमध्ये पार्थ पवार सक्रिय होतील.Pakistan Afghanistan conflict : पाकिस्तानकडून युद्धाची घोषणा, १३३ तालिबानी मारल्याचा दावा, वाचा १० मोठ्या अपडेट शिंदेंच्या शिवसेनेकडून शेवाळेंना संधी?एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला राज्यसभेची एक जागा मिळणार आहे. त्या एका जागेसाठी शिवसेनेत मोठी लॉबिंग सुरू असल्याचे समजते. पण एकनाथ शिंदेंकडून माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. गजानन कीर्तिकर हेदेखील राज्यसभेवर जाण्यास इच्छुक आहेत, पण शिंदेंकडून शेवाळेंची निवड होणार असल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले. पुढील २ दिवसांत शेवाळेंच्या नावाची घोषणा होऊ शकते. Rinku Singh father death : रिंकू सिंगवर दु:खाचा डोंगर कोसळला, वडिलांचं निधन भाजपकडून रामदास आठवलेंना पुन्हा संधी ?राज्यसभेसाठी भाजपकडून ४ नावांवर शिक्कामोर्तब होणार आहे. यामधील रामदास आठवले यांना एक जागा सोडली जाईल, असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आहे. रामदास आठवले सध्या केंद्रात मंत्री आहेत. दलित मतांना आकर्षित करण्यासाठी भाजपकडून आठवलेंना पुन्हा एकदा राज्यसभेवर पाठवले जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. भाजपकडून उर्वरित ३ नावे कोण असतील? याबाबत सस्पेन्स कायम आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज तातडीने दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यामध्ये भाजपच्या राज्यसभेच्या ४ नावांवर शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विनोद तावडे, विजया रहाटकर, प्रीतम मुंडे आणि धैर्यशील पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. पण भाजपकडून कोणत्या नावाला पसंती दिली जाते, हे २ दिवसात स्पष्ट होईल. Pakistan Afghanistan conflict : ज्याची भीती होती तेच झालं, भारताच्या शेजारी युद्धाला सुरूवात मविआला फक्त एकच जागा, कोण जाणार राज्यसभेवर?महाविकास आघाडीला राज्यसभेसाठी एकच जागा मिळाली आहे, पण त्यासाठी ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील अनेक जण इच्छुक आहेत. प्रत्येक पक्षाकडून त्या जागेवर दावा केला जात आहे. काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेने उघडपणे एका जागेवर दावा केला आहे, तर दुसरीकडे शरद पवार पुन्हा एकदा राज्यसभेवर जाण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार म्हणाले की, शरद पवार यांनी राज्यसभेत जावे अशी सर्वांची इच्छा आहे, परंतु अद्याप त्यांच्याशी या विषयावर चर्चा झालेली नाही. त्यांच्या प्रकृतीनुसार त्यांचा निर्णय अपेक्षित आहे. तर विद्यमान खासदार प्रियंका चतुर्वेदी, माजी खासदार राजन विचारे, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सुद्धा राज्यसभेवर जाण्यास इच्छुक असल्याचे समजते. काँग्रेसकडून अद्याप कोणतेही नाव समोर आलेले नाही, पण पक्षाकडून दावा केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) १०, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) २० आणि काँग्रेसचे १६ आमदार आहेत. मविआकडे ४६ आमदारांचे संख्याबळ आहे. राज्यसभेची जागा जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीची ३७ मते आवश्यक आहेत. Sharad Pawar : शरद पवार राज्यसभेवर जाणार का? राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्याने नेमकं तेच सांगितले
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



