जगात सध्या युद्धाचे ढग दिसत आहेत. अमेरिका – इस्त्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याला त्यांच्याकडून चोख प्रत्युत्तर मिळत आहे. मध्य पूर्वेतील या युद्धाचा फटका सर्वांनाच बसतानादिसत आहे. इराणने विविध देशातील अमेरिकी सैन्याच्या ळावरही हल्ला चढवला. सर्वत्र तणावाचे वातावरण असून त्यातच आता पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली जरदारी यांनी एक मोठा दावा केला आहे. भारत आणखी एका युद्धाची तयारी करत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. भारतीय नेते उघडपणे युद्धाबद्दल बोलत आहेत. पण प्रादेशिक शांततेचे नेहमीच समर्थक असल्यामुळे मी या मार्गाची शिफारस करणार नाही असं त्यांनी नमूद केलं. भारतासाठी शांततेचा संदेश पाकिस्तान भारतासोबत सार्थक आणि शांततापूर्ण चर्चेसाठी तयार आहे आणि युद्धापेक्षा प्रादेशिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी संवाद हा एकमेव मार्ग आहे, असेही झरदारी म्हणाले. ‘भारताला माझा संदेश आहे की युद्धाच्या वातावरणातून बाहेर पडून अर्थपूर्ण चर्चेसाठी टेबलावर बसा, कारण हाच प्रादेशिक शांतता आणि स्थिरतेचा मार्ग आहे.’ असं त्यांनी सांगितलं. दक्षिण आशियातील सुरक्षा परिस्थितीवरून वाढलेल्या तणावाच्या वेळी झरदारी यांचं हे विधान आलं आहे. सोमवारी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना, विरोधकांच्या गदारोळात, झरदारी यांनी अफगाणिस्तानबद्दलही एक विधान केलं. अफगाणिस्तानबाबत कठोर भूमिका अफगाण सीमेपलीकडून होणाऱ्या हल्ल्यांवरही झरदारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दोहा कराराच्या अटींचे पालन न केल्याचा आरोप त्यांनी अफगाण नेतृत्वावर केला. झरदारी यांच्या मते, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान आणि बीएलए सारख्या दहशतवादी गटांना अफगाण भूमीतून पाठिंबा मिळत आहे. पाकिस्तानचा संयम संपला आहे आणि कोणत्याही बाह्य किंवा देशांतर्गत शक्तीला पाकिस्तानची शांतता भंग करू दिली जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. इराणवरील हल्ल्याचा केला निषेध पाकिस्तानी राष्ट्रपतींनी इराणविरुद्ध सुरू असलेल्या लष्करी कारवायांचा निषेध केला. एवढंच नव्हे तर त्यांनी इराणच्या सार्वभौमत्वाला पाठिंबा दर्शविला आणि अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. दरम्यान, इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या हत्येनंतर झालेल्या हिंसक निदर्शनांना प्रतिसाद म्हणून पाकिस्तानव्याप्त गिलगिट-बाल्टिस्तानमधील स्कार्दूमध्ये तीन दिवसांचा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरही संघर्ष सुरूच आहे.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- पुणे: मानवतेला काळिमा फागणारी घटना; ३ वर्षांच्या 'डॅनी' श्वानाला बेल्टने बेदम मारहाण करत भिंतीवर आपटले, नराधम मालक परदेशीविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: कोट्यवधी रुपये 'सांडपाण्यात'! दर्जाहीन मलवाहिन्या आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे मुळा-मुठा नदीची बिकट अवस्था
महाराष्ट्र
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- कोल्हापूर: संकश्र्वरजवळ भीषण अपघात! तिरुपती दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा मालवाहू ट्रकला मागून जोरदार धडक; नाशिकमधील तरुणाचा जागीच मृत्यू
- अमरावती: समृद्धी महामार्गावर भीषण थरार! धामणगाव रेल्वे परिसरात टायर फुटल्याने ट्रकला अचानक लागली भीषण आग; चालकाचा जिवंत जळून मृत्यू, तर दुसऱ्याचा पुलावरून खाली पडून अंत
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
गुन्हा
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
- बीड: अहिल्यानगर महामार्गावरील कासार ओढ्यात आढळला निर्वस्त्र व दाढी वाढलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; आष्टी परिसरात उडाली खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: एकाला मंत्री बनवलं, दुसऱ्याला पद्मविभूषण दिलं… मुख्य निवडणूक आयुक्तांच्या वादावरून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
- नवी दिल्ली: पोलिसांना मोठा चकवा! CJP चे नेते अजिंक्य शिंदे, सौरभ दास आणि आशुतोष रांका थेट जंतरमंतरवर; पोलिसांची धावाधाव, पुन्हा घेतले ताब्यात!
- नवी दिल्ली: सुटकेनंतर ध्रुव राठीचा धक्कादायक खुलासा ;पोलिसांनी माफी मागितली, सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण ते डिटेंशन नव्हे तर अपहरण होतं!
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!



























Subscribe to my channel




