किशोर पाटील/ प्रतिनिधी: शिवसेनेत उभी फूट पडल्यापासून अनेक नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले. अनेक आमदार, विविध जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्षांनी तीन वर्षांपूर्वी शिंदे सेनेत प्रवेश केला. तर आता कोणत्याही निवडणुका नसतानाही इतर काही कारणांमुळे काही नेते शिंदे सेनेच्या वाटेवर असल्याचे दिसते. माजी खासदार तथा शिवसेना ठाकरे गटाचे नेते उन्मेष पाटील शिवसेना शिंदे गटात प्रवेश (Unmesh Patil in Eknath Shinde Shivsena) करणार आहेत. येत्या ६ मार्च रोजी ते शक्ती प्रदर्शन करत मुंबईत शिंदे सेनेत दाखल होतील. या प्रवेश सोहळ्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. जप्तीची कारवाई आणि पक्ष सोहळा छत्रपती संभाजीनगरच्या बँकेकडून उन्मेष पाटील यांच्या मालमत्तेची जप्तीची कारवाई सुरू होताच त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पाटील यांनी 2024 च्या लोकसभेला भाजपकडून तिकीट नाकारल्यामुळे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. ठाकरेंच्या शिवसेनेकडून 2024 ला चाळीसगाव विधानसभा देखील लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता. आता त्यांच्या या पक्ष सोहळ्याने चाळीसगावसह जळगावच्या राजकारणात शिंदे सेनेत गट तट तयार होतील की शिवसेना अधिक मजबूत होईल ही चर्चा होत आहे. तीन दिवसांनी प्रवेश सोहळा उन्मेष पाटील यांनी अखेर ठाकरे गटाला रामराम ठोकला आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ६ मार्च रोजी मुंबई येथे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा अधिकृत प्रवेश होणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एका सहकारी बँकेने थकीत कर्जापोटी मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू केल्यानंतर त्यांच्या राजकीय भूमिकेत बदल झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे हा पक्ष प्रवेश दबावा खाली तर होत नाही ना? अशी चर्चाही होत आहे. गेल्या महिन्यात त्यांनी श्रीकांत शिंदे यांची भेट घेत प्राथमिक चर्चा केली होती. २०१९ मध्ये भाजपच्या तिकिटावर लोकसभेत निवडून आलेल्या पाटील यांना २०२४ मध्ये उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांची सक्रियता कमी झाली होती. आता त्यांच्या शिंदेसेनेतील प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेचा फायरब्रँड नेते गुलाबराव पाटील यांच्या प्रतिक्रियेची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. तर मित्र पक्ष भाजप आणि चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची काय प्रतिक्रिया असेल याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

मुंबई: शिवाजी पार्कमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन
मुंबई: शिवाजी पार्कमधील आंदोलनादरम्यान ७५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
मुंबई: अभिनेता डिनो मोरिया यांची मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात चौकशी
देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




