पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Pm Narendra Modi) पुणे दौऱ्याला काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसने जोरदार आंदोलन करून विरोध केला आहे. रविवारची सुट्टी असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत विद्यार्थ्यांनी प्रवास केल्याचं कसं काय दाखवलं, असा आक्षेप राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलाय. त्यासोबत पंतप्रधानांना काळ्या रंगाचं इतकं वावडं का आहे, असा सवाल ही राष्ट्रवादी काँग्रेसने विचारला. यावरच आपली प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, ''कोणी काळे, निळे, पिवळे कोणतेही झेंडे दाखवू दे. जनता बघते, ते फक्त स्वतःचं अस्तित्व दाखविण्यासाठी हे करतायेत.''
एबीपी माझाशी बोलताना फडणवीस म्हणाले की, ''एखादं चांगलं काम करून श्रेय घ्या, पण कामं करायची नाहीत आणि दुसऱ्यांसमोर निदर्शन करायची. देव त्यांना सुदबुद्धी देवो. तसेच अण्णा साहेब पाटलांच्या आणि अटल बिहारी वाजपेयींच्या नावाच्या उद्याना समोर आंदोलन करण्याची जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने निवडली. मला यांच्या बुद्धीची कीव येते, हे दुर्दैव्य आहे, असेही ते म्हणाले आहेत.
ते पुढे म्हणाले की, राज्यातील या सरकारला महाविकास आघाडी म्हणायचं की महावसुली आघाडी म्हणायची. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना देखील टोला लगावला आहे. मेट्रोचे श्रेय घेण्यासाठी बरेच लोक येत आहेत. मात्र याचं पूर्ण श्रेय फक्त मोदींचं असल्याचं ते म्हणाले. तसेच आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीवर भाष्य करत ते म्हणाले, ''आता हे वॉर्डाची रचना बदलत आहेत. काय-काय बदलायचं ते बदला, आम्हाला काहीच फरक पडत नाही. या जनतेच्या विश्वासावर आम्ही या महापालिकेत पुन्हा बसू.'' दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर असून त्यांनी पुण्यात मेट्रोच्या दोन नवीन मार्गिकेचे उद्घाटन केले आहे. मोदी यांच्या पुणे दौऱ्याला विरोध करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.हे पण वाचा-
शहर
- पादचाऱ्यांचा मोठा विजय! रस्त्यावर सुरक्षित चालणे हा आता 'मूलभूत हक्क'; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
- पुणे-नाशिक रेल्वे मार्गात तिसऱ्यांदा मोठा बदल! 'जीएमआरटी' दुर्बिणीच्या संरक्षणासाठी नवा मार्ग निश्चित, ताशी १६० किमी वेगाने धावणार ट्रेन
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
महाराष्ट्र
- पुणे-नाशिक रेल्वे मार्गात तिसऱ्यांदा मोठा बदल! 'जीएमआरटी' दुर्बिणीच्या संरक्षणासाठी नवा मार्ग निश्चित, ताशी १६० किमी वेगाने धावणार ट्रेन
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
- PF खातेदारांसाठी मोठी खुशखबर! महिनाअखेरीस सुरू होणार नवी सुविधा; आता UPI आणि ATM द्वारे थेट काढता येणार पीएफचे पैसे!
- नांदेड : अनैतिक संबंधातून पतीचा निर्घृण खून , पत्नी आणि प्रियकराने मृतदेह पुरून रचला हत्येचा थरार.
गुन्हा
- नाशिक: सुटकेसमधील महिलेच्या हत्येचा उलगडा; हातावरील टॅटू ठरला तपासाचा धागा, प्रेम प्रकरणातून भीषण हत्या.
- अंबरनाथ: डॉक्टर पतीची सीसीटीव्हीतून पत्नीवर पाळत; हुंड्यासाठी छळ आणि मारहाणीला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या.
- पुणे: काळ आला होता पण वेळ आली नव्हती! ५० चिमुरड्यांचा जीव टांगणीला; पुण्यात चालकाच्या दारुड्या वृत्तीमुळे मोठा अनर्थ!
- मंदिरात बनावट लग्न करून कॉलेज तरुणीवर वारंवार अत्याचार; पांढरकवडा पोलिसांत नराधमाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल
राजकीय
- महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: मतदानाला सुरुवात, खासदार बंडाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले!
- दिल्ली: ऑपरेशन टायगर फत्ते! उद्धवसेनेच्या ६ खासदारांचा वेगळा गट स्थापन, लोकसभा अध्यक्षांकडून मिळाली मान्यता.
- फ्रान्स: "आम्ही इंस्टाग्रामवर सर्वात प्रसिद्ध आहोत!": G7 परिषदेत जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींना दिले मजेशीर उत्तर.
- मुंबई: महाराष्ट्र पुन्हा 'राजकीय भूकंप'? ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याची तयारी; 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा!
इतर
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
- दैनिक राशिभविष्य १८ जून २०२६: गजकेसरी राजयोगामुळे या राशींचे नशीब फळफळणार, मिळणार धनलाभ!
- 'फूड सेफ्टी' अलर्ट! तुमच्या किचनमधील चाकू ठरू शकतात आजारांचे कारण; FSSAI ने जारी केले कडक नवीन नियम.
- आजचे राशिभविष्य १७ जून २०२६: चंद्र, शुक्र आणि गुरूच्या कृपेने या राशींना मिळणार तिप्पट लाभ!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

पुणे शहरात अतिक्रमण विरोधात पुणे महापालिकेचा धडक कारवाई सुरू!
पुणेकर, आजच्या महत्त्वाच्या बातम्या तुमच्यासाठी! सर्व ताज्या घडामोडींसाठी Pune News ला फॉलो करा
माझ्याविरोधात तक्रार करणारे तुम्ही कोण?" असे म्हणत संबंधित अधिकाऱ्याने नागरिकांना उद्धट वागणूक दिली.
देश विदेश
- भारतासाठी सर्वात मोठा दिलासा! 'होर्मुझ' जलमार्ग खुला होताच ४० एलपीजी टँकर्स भारताकडे रवाना, गॅस-इंधन स्वस्त होणार?
- मोठी आर्थिक घडामोड! भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार १५ जुलैपासून लागू; स्कॉच व्हिस्की आणि लक्झरी कार होणार स्वस्त
- हरियाणा: पानिपतमध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर नातेवाईकाकडून अत्याचार; 'रमेश छोटू' वर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल!
- ओडिशा: समोरा-समोरील धडकेत दोन ट्रकला भीषण आग, दोन्ही चालक जिवंत जळाले!
























Subscribe to my channel




