शिरुर पोलिसांची धडक कारवाई; रेणुकामाता मंदिर परिसरात गावठी पिस्तूल व काडतुसासह आरोपी गजाआड!

शिरुर: पोलिसांची मोठी कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुस बाळगणाऱ्या आरोपीला अटक
शिरुर (पुणे), दि. २८ नोव्हेंबर २०२६
शिरुर शहर पोलिस स्टेशनच्या डी.बी. पथकाच्या पथकाने गावठी (देशी) पिस्तूल व जिवंत काडतुस बेकायदेशीररित्या जवळ बाळगणारा आरोपी अटक केला आहे.
दिनांक २७ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे १०.५० वाजता शिरुर शहर हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस उपनिरीक्षक गोविंद खर्टींग यांच्या नेतृत्वाखालील पथकाला गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, मौजे शिरुर शहर येथील रेणुकामाता मंदिर परिसरातील रिकाम्या जागेत एक व्यक्ती बेकायदेशीररित्या गावठी पिस्तूल व जिवंत काडतुस बाळगून फिरत आहे.
या बातमीनंतर पो.उ.नि. गोविंद खर्टींग यांनी शिरुर पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांची परवानगी घेऊन पथक व पंचासह घटनास्थळी धाव घेतली. तेथे संशयित व्यक्ती सापडल्यानंतर त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी पिस्तूल व त्यात एक जिवंत काडतुस सापडले.
आरोपीने आपले नाव गणेश राम गव्हाणे, वय ३३ वर्षे, व्यवसाय चालक, राहणार गव्हाणवाडी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर असे सांगितले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली आणि न्यायालयसमोर हजर केले. न्यायालयाने आरोपीला पोलिस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. संदिप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रविंद्र भोसले आणि पोलीस निरीक्षक श्री. विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पो.उ.नि. गोविंद खर्टींग यांच्यासह पो.अं. नितेश थोरात, बालाजी मोटे, संदिप खेडकर, राहूल वाघमोडे, विजय शिंदे, अर्जुन भालसिंग, अजय पाटील आणि अंबादास थोरे यांचा समावेश होता.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोविंद खर्टींग हे करत आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *