पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:सर्वांना सोबत घेऊनही आपण‎ निष्काम सेवा करू शकतो

एक काळ असा होता, जेव्हा समाजसेवा वेगळी आणि राजकारण‎वेगळे असायचे. हळूहळू समाजसेवी संस्था तयार झाल्या आणि अशा‎संस्थांमध्येही राजकारण शिरले. पुढे ही सेवा व्होट बँकेशी जोडली गेली.‎पण देशात काही असे समाजसेवक होऊन गेले, ज्यांची दृष्टी राष्ट्रावरही‎होती आणि समाजावरही; पण त्यांचे आचरण धार्मिक होते. जसे‎विवेकानंद म्हणायचे की, शिष्टता आणि सेवा यात फरक आहे. आपण‎कुणाला शिक्षणासाठी पैसे दिले, आजारपणात मदत केली, शाळा‎उघडल्या, अनाथालये बांधली- हे एका चांगल्या माणसाचे कर्तव्य आहे.‎पण खरी सेवा तेव्हाच घडते, जेव्हा बदल्यात काहीही घेण्याची अपेक्षा‎नसते. सर्वांना सोबत घेऊन सेवा करण्याचे उत्तम उदाहरण म्हणजे‎पंचमुखी हनुमानाचे रूप. हनुमानाला राक्षसाला मारायचे होते. पण ते‎एकटे त्याला मारू शकत नव्हते, कारण त्या राक्षसाला वरदान होते.‎म्हणून हनुमानाने पाच मुखे धारण केली- गरुड, वराह, नृसिंह, हयग्रीव‎आणि स्वतः हनुमान. यातून हनुमानाने हे शिकवले की, सर्वांना सोबत‎घेऊनही निष्काम भावनेने सेवा करता येते आणि अशीच सेवा असायला‎हवी.‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *