2017 मध्ये जग ‘सिंगल युज प्लास्टिक’ च्या समस्येने त्रस्त होते आणि हॉटेल्स त्याला विचित्र पर्याय शोधत होते तेव्हा बेंगळुरूच्या ख्राइस्ट युनिव्हर्सिटीच्या हिरव्यागार आवारात प्रोफेसर साजी वर्गीस नेहमीप्रमाणे फिरत होते. अचानक त्यांची नजर जमिनीवर पडलेल्या नारळाच्या एका सुक्या पानावर पडली. भारतात अशी पाने सगळीकडेच दिसतात आणि सामान्यपणे शेतातला कचरा म्हणून ती जाळली जातात. त्यांनी ते पान उचलले आणि बोटांमध्ये फिरवले. त्यांना काहीतरी वेगळे जाणवले. पानाचा पृष्ठभाग गुळगुळीत आणि चमकदार होता. झाडावरून तुटूनही ते कुजले नव्हते किंवा ओलेही झाले नव्हते. त्यांनी विचार केला, ‘हे सुके पान पाणी का रोखून धरते?’ उत्सुकतेपोटी ते काही पाने लॅबमध्ये घेऊन गेले. तिथे त्यांना समजले की निसर्गाने आधीच यात उत्तम इंजिनिअरिंग केले आहे. पानावर नैसर्गिक आणि अन्नासाठी सुरक्षित अशा मेणाचा थर होता. मग त्यांनी हे पान नळीसारखे घट्ट गुंडाळले. त्या मेणाच्या थराने द्रव पदार्थाला सहज दूर ठेवले. प्रोफेसर साजी यांच्या लगेच लक्षात आले की, हा केवळ बागेतला कचरा नसून उत्तम ‘बायोडिग्रेडेबल स्ट्रॉ’ चा (नळीचा) आराखडा आहे. कागद आणि प्लास्टिकपेक्षा हा पर्याय कितीतरी पटीने उत्तम आहे हे त्यांना जाणवले. ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांसोबत काम सुरू केले. शेवटी त्यांनी ‘ब्राऊन रीड ॲग्री वेस्ट इनोव्हेशन्स’ ही कंपनी स्थापन करून ‘सनबर्ड स्ट्रॉज’ बाजारात आणल्या. त्यांनी तयार केलेल्या बहुस्तरीय (मल्टी-लेअर्ड) स्ट्रॉने बाजारातील इतर पर्यायांच्या त्रुटी दूर केल्या. नैसर्गिकरीत्या प्लास्टिक स्ट्रॉ नष्ट होण्यासाठी 500 पेक्षा जास्त वर्षे लागतात. ती खूप टिकाऊ असते. पण पेट्रोलियम घटकांमुळे विषारीही असते. दुसरीकडे पेपर स्ट्रॉसाठी जिवंत झाडे कापावी लागतात. रासायनिक डिंक आणि ब्लीज वापरूनही ती अवघ्या 20 मिनिटांत मऊ पडते. याउलट, नारळाच्या झावळ्यांपासून बनवलेली स्ट्रॉ 100% गळलेल्या पानांपासून बनते आणि रसायनांपासून मुक्त असते. गरम किंवा थंड पेय असो, ती 3 ते 4 तास सहज टिकते. या शोधाचे सौंदर्य त्याच्या कच्च्या मालात आहे. नारळाचे झाड भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेले आहे. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गोव्याच्या किनारपट्टीवर 20 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर नारळाच्या बागा आहेत. एक झाड दरवर्षी 12 ते 15 पाने गाळते. ही पाने जाळून वातावरणात कार्बन सोडण्याऐवजी ‘सनबर्ड स्ट्रॉज’ या शेतातल्या कचऱ्याचे रूपांतर एका मौल्यवान उत्पादनात करते. यातून विद्यार्थ्यांना खालील गोष्टी शिकायला मिळतात: सामान्य गोष्टींकडे पाहायला शिका : नारळाची पाने हजारो वर्षांपासून गळत आहेत, पण त्यांच्याकडे एका उत्पादनाच्या दृष्टीने पाहण्यासाठी ती पारखी नजर हवी होती. जगात काय नाही हे पाहण्यापेक्षा कशाकडे दुर्लक्ष झाले आहे ते पाहा. ‘का’ आणि ‘असे झाले तर’ असे प्रश्न विचारा : ओल्या होणाऱ्या पेपर स्ट्रॉसारखी रोजची समस्या असो वा पाणी रोखणारे पान, अशी नैसर्गिक गोष्ट दिसो, प्रश्न विचारत राहा. ही उत्सुकता म्हणजेच समस्येकडून पेटंटकडे जाणारा पूल आहे. उपलब्ध आहे, त्यातूनच सुरुवात करा : प्रोफेसर साजी यांनी सुरुवातीला मोठ्या निधीची वाट पाहिली नाही. त्यांनी कॅम्पसच्या एका खोलीत हाताने पाने गुंडाळायला सुरुवात केली. आपल्या कल्पना साध्या पद्धतीने व लवकर वापरात आणाव्यात. कॅम्पसकडून कॉर्पोरेट जगताकडे जाण्याचा मार्ग शोधा : प्लास्टिकवर बंदी आल्यामुळे व्यावसायिक पेपर स्ट्रॉला कंटाळले आहेत हे विद्यार्थ्यांनी पाहिले, तेव्हा त्यांनी नेमक्या योग्य वेळी आपले उत्तम उत्पादन बाजारात आणले. इकोसिस्टिमच्या पाठिंब्याचा फायदा घ्या : या टीमने हे काम एकट्याने केले नाही. व्यवसाय मार्गदर्शन, कायदेशीर चौकट आणि गुंतवणूकदारांचे नेटवर्क यासाठी त्यांनी ‘आयआयएम बंेगळुरू’ च्या ‘एनएसआरसीईएल’ इनक्युबेटरच्या ‘इम्पॅक्ट ऑर्बिट प्रोग्राम’ ची मदत घेतली. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांकडे सहसा या गोष्टी नसतात. आज ते 10 हून अधिक देशांमध्ये निर्यात करत आहेत. फंडा असा की, ग्रामीण महिलांना सक्षम करून स्वतःचे शाश्वत आणि सामाजिक बदलाचे उत्पादन बनवले तर कोणीही जागतिक खरेदीदारांना सहज आकर्षित करू शकते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: नगरसेवक झाल्यानंतर सगळेच जण अचानक बिल्डर का होतात; भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांचे लोकप्रतिनिधींना खडे बोल व महत्त्वाचे सल्ले
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- पुणे: नाशिक महामार्गावरील आळेखिंड येथे मालवाहतूक ट्रकला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना, केबिन जळून खाक
- पुणे: महापालिकेने नवले पुलाचा हरितपट्टा स्वच्छ करत लावली ५० नवीन झाडे; 'नो गार्बेज झोन'चे नियोजन
महाराष्ट्र
- नांदेड: शेतकऱ्याला त्रास दिला तर थेट गजाआड पाठवणार; मायक्रो फायनान्स कंपन्या आणि खासगी सावकारांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सज्जड इशारा
- सांगली: पूर्ववैमनस्यातून ईश्वरपुरात थरार! तरुणाची कोयता अन् चॉपरने वार करून निर्घृण हत्या, हल्लेखोर पसार
- उल्हासनगर: महापालिका शाळांमध्ये आता दुमदुमणार इंग्रजीचे धडे; गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार शिक्षणाचा मोठा दिलासा
- सांगली: राजकारणात कदम-लाड संघर्षाची नवी ठिणगी; किरण लाड हेच जी. डी. बापूंचे खरे वारसदार असल्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
गुन्हा
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ
- बंगळुरू: पंचतारांकित हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये विजेचा धक्का लागून दोन परदेशी पर्यटकांचा मृत्यू; वाचवताना दोघे जण गंभीर जखमी
- गोवा: एसटी आरक्षण रखडल्यास अनेकांचे भाग्य उजळणार; २०२५-२७ विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणांना नवी दिशा
- कानपूर: तीन बायका अन् एक पती! करवा चौथच्या दिवशी पहिली पूजा करण्यावरून तिघींमध्ये तुफान राडा, प्रकरण पोहोचले पोलिसांत"





























Subscribe to my channel




