महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी! आमदार संजय गायकवाडांवर निलंबनाची कारवाई; शेतकरीविषयक वादग्रस्त वक्तव्य उपमुख्यमंत्र्यांना भोवणार?

महाराष्ट्राच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. बुलढाण्याचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या विधानामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याने आणि वरिष्ठांच्या भूमिकेशी विसंगत वर्तन केल्यामुळे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अत्यंत कठोर भूमिका घेत आमदार संजय गायकवाड यांच्यावर पक्षातून निलंबनाची कारवाई करण्याचे थेट आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

प्रकरणाची पार्श्वभूमी आणि पक्षाची आक्रमक भूमिका:

मागील काही दिवसांपासून संजय गायकवाड यांची विविध विधानांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा राहिली आहे. नुकतेच त्यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केले होते, ज्यामुळे सर्वसामान्य शेतकरी वर्गामध्ये आणि विरोधकांमध्ये संतापाची लाट पसरली. एकीकडे शिंदेंची शिवसेना राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी व्यापक मोहीम राबवत आहे. शेतकरी कुटुंबातील लाडक्या बहिणींना २५ हजार शिलाई मशिन्सचे वाटप, मुलींना सायकलींचे वाटप तसेच दुष्काळग्रस्त भागात अन्नधान्याचे ट्रक पाठवण्याचे मोठे सामाजिक व राजकीय उपक्रम पक्षाकडून हाती घेण्यात आले आहेत. अशा वेळी पक्षाचाच एक आमदार शेतकरीविरोधी किंवा बेजबाबदार विधाने करत असेल, तर त्यामुळे संपूर्ण पक्षाची प्रतिमा डागाळत असल्याची तीव्र भावना पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती.

कठोर शिस्तभंगाची कारवाई आणि राजकीय पडसाद:

शेतकरी हा आपला अन्नदाता असून त्याच्याविषयी किंवा कुठल्याही घटकाविषयी अवमानकारक किंवा वादग्रस्त वक्तव्ये पटवून घेतली जाणार नाहीत, असा स्पष्ट संदेश वरिष्ठांनी दिला आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने पावले उचलत संजय गायकवाड यांच्यावर निलंबनाचे आदेश जारी केल्याचे समजते. महायुती आणि विशेषतः शिंदेंच्या शिवसेनेच्या अंतर्गत वर्तुळात या कारवाईमुळे मोठी चलबिचल सुरू झाली असून आगामी काळात राजकीय समीकरणे आणि शिस्तीच्या मुद्द्यावर या निर्णयाचे दूरगामी परिणाम पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *