अलीकडच्या वर्षांतील राजकारणावर नजर टाकलीतर अनेक प्रस्थापित प्रादेशिक पक्ष सत्तेतून बाहेर गेलेनाहीत, तर त्यांच्यासमोर अस्तित्त्वाचे संकटही उभेराहिले आहे. त्यांनी जनाधार गमावला, हे याचे मुख्यकारण नाही. कौटुंबिक कलह व पक्षाध्यक्षांनंतरचे नेतृत्वबदल योग्य प्रकारे न हाताळणे, हेच त्यांच्या पतनाचेमुख्य कारण आहे. तसे तर या सर्व पक्षांचा जनाधार आजही कायम आहे.त्यांना मिळालेली मते हाच याचा पुरावा आहेत. 2009च्या लोकसभा निवडणुकीत सर्व प्रादेशिक पक्षांना31.2% मते मिळाली होती. 2014 मध्ये हे प्रमाण 35.8%, 2019 मध्ये 28.1% आणि 2024 मध्ये 33.5% होते. नुकत्याच झालेल्या दिल्ली निवडणुकीत ‘आप''ने आणि पश्चिम बंगालमध्ये ‘तृणमूल ''ने सत्ता गमावली. तरीही ‘आप''ला 43.6% व ‘तृणमूल''ला 40.8% मते मिळाली. बहुपक्षीय लोकशाहीत ही मते मोठा जनसमर्थनाचासंकेत देतात. परंतु हे पक्ष घटत्या जनाधारामुळे नव्हे, तर अंतर्गत व बाह्य कारणांमुळे संकटाचा सामना करतआहेत. भारतातील प्रादेशिक पक्षांनी राज्ये, जाती आणि समुदायांना आवाज दिला होता. वास्तविक राष्ट्रीय पक्षत्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी धडपडत होते. परंतु,यातील बहुतांश पक्षांत एकच समान कमकुवतपणादिसून आला. हे पक्ष एखाद्या कौटुंबिक व्यवसायासारखेचालवले जातात. त्यामुळे कुटुंबात भांडण झाले की तेफुटतात. देशात याचा मोठा इतिहास राहिला आहे. 2010मध्ये पंजाबचे तत्कालीन अर्थमंत्री आणि मुख्यमंत्रीप्रकाशसिंग बादल यांचे पुतणे मनप्रीतसिंग बादल यांनीअकाली दलाच्या धोरणांवर उघडपणे असंतोष व्यक्तकेला. त्यांनी ‘पीपल्स पार्टी ऑफ पंजाब'' नावाचा वेगळापक्ष स्थापन केला. 2016 मध्ये हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीनझाला. 2005 मध्ये शिवसेनेतही फूट पडली आणि राजठाकरे आपले चुलत भाऊ उद्धव ठाकरे यांच्यापासूनवेगळे झाले. 2017 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीसमाजवादी पक्षात दोन गट पडले. दोन्ही गटांनी पक्षाच्याचिन्हावर दावा केला. शेवटी अखिलेश यादव यांनीपक्षाची सूत्रे हाती घेतली, तर त्यांचे काका शिवपालयादव यांनी वेगळा पक्ष काढला. हरियाणामध्ये देवीलालयांनी स्थापन केलेला इंडियन नॅशनल लोकदल पक्षही2018 मध्ये फुटला. त्यांचे पुत्र ओमप्रकाश चौटालायांच्या मोठ्या मुलाने म्हणजेच अजय सिंह यांनी‘जननायक जनता पार्टी'' स्थापन केली. 2020 मध्येरामविलास पासवान यांच्या निधनानंतर त्यांच्यालोकजनशक्ती पक्षाला असाच धक्का बसला. 2021मध्ये पासवान यांचे लहान भाऊ पशुपती कुमार पारस हेचिराग पासवान यांच्याऐवजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षबनले. त्याच वर्षी पारस यांनी आपला विरोधी गट तयारकरण्यासाठी पक्षाच्या सहापैकी पाच खासदारांनाफोडले. चिराग स्वतःच्या वडिलांनी स्थापन केलेल्यापक्षात एकाकी पडले. महाराष्ट्रात तर याहून मोठे संघर्षपाहायला मिळाले. शिवसेनेचे नाव, चिन्ह व झेंड्यासाठी2022 मध्ये एकनाथ शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटाशीलढा दिला आणि विजय मिळवला. 2023 मध्ये अजितपवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबापासून वेगळेझाले. त्यांचा गटही पक्षाचे चिन्ह आणि झेंडामिळवण्यात यशस्वी ठरला. 2026 च्या बंगालनिवडणुकीत ‘टीएमसी''चा पराभव झाल्यानंतर एकामहिन्यातच पक्ष ममता बॅनर्जी आणि ऋतब्रत बॅनर्जीयांच्याभोवती दोन गटांत विभागला गेला. पक्षाच्याकामकाजात अभिषेक बॅनर्जी यांच्या भूमिकेवरून निर्माणझालेला असंतोष हे यामागचे कारण ठरले. ताजे प्रकरणबसपाचे आहे; मायावती पुतण्या आकाशला पक्षातमहत्त्वाची जबाबदारी देतात. नंतर हटवतातही. याघडामोडींची कारणे समजून घेणे कठीण नाही. या पक्षांतनेतृत्व निवडण्याची स्पष्ट व्यवस्था बहुदा नसते. अशावेळी मुलगा, पुतण्या किंवा भावाला सर्वोच्च पदावरबसवले जाते. पक्षाचा संस्थापक कमकुवत होतो किंवामृत्यू होतो. तेव्हा कुटुंबातील सदस्यांना त्या खुर्चीवरहक्क वाटतो. कुटुंब विभागले की कार्यकर्तेही विभागलेजातात. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) अनेक प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व एकाचगोष्टीवर अवलंबून असते. ती म्हणजेएखादा नेता किंवा कुटुंबावर मतदारांनीठेवलेला विश्वास. तेच कुटुंब उघडपणेभांडताना दिसते. तेव्हा हा विश्वास तुटतो.या नुकसानाची भरपाई करणे अत्यंतकठीण असते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: पक्ष बदलणाऱ्यांना माफ करणार नाही; मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मतपेट्या उघडताच नेत्यांना जाब विचारणाऱ्या संतापजनक चिठ्ठ्या बाहेर!
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मोठा फेरबदल! "मी प्रस्थापित गिळलाय, १८ वर्षांचा दुष्काळ संपवलाय"; सतीश चव्हाण पराभवाच्या उंबरठ्यावर असताना रविकिरण (रविराज) साबळेंचा घणाघात
- पुणे: पर्यावरणाला धोका खरा, पण पत्ता चुकीचा! टोरंट पॉवरचा प्रकल्प भीमाशंकरमध्ये नव्हे तर १५ ते २० किमी अंतरावर कर्जतमध्ये
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- पुणे: अजितदादांच्या अपघातामागचं सत्य हा लाखो नागरिकांच्या विश्वासाचा प्रश्न, अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशी व पारदर्शकतेवर जय पवारांची महत्त्वपूर्ण भूमिका
- कोल्हापुर: ऊस दर आंदोलनाचा भडका! मिणचे-तासगाव मार्गावर चालकाला खाली ओढत उसाचा ट्रॅक्टर पेटवला, १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल
- सातारा: फलटण-लोणंद महामार्गावर भीषण अपघात! उसाच्या ट्रॅक्टरची धडक बसून २० वर्षीय तरुणाचा मृत्यू, वडिलांच्या निधनानंतर अडीच महिन्यांतच कुटुंबावर पुन्हा दुःखाचा डोंगर
- छत्रपती संभाजीनगर: पक्ष बदलणाऱ्यांना माफ करणार नाही; मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मतपेट्या उघडताच नेत्यांना जाब विचारणाऱ्या संतापजनक चिठ्ठ्या बाहेर!
गुन्हा
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
- पुणे: भरवस्तीत तरुणीला बळच उचलून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ, संतापलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून दिला पोलिसांच्या हातांत
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- बिहार: विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का! पाटणा शिक्षक मतदारसंघात ३ दशकांची वर्चस्वाची परंपरा खंडित करत आरजेडीचा दणदणीत विजय
- गोवा: विक्रोळीतील २१ वर्षीय विद्यार्थी कुशाग्र पटालेचा दुचाकी-टॅक्सी अपघातात दुर्दैवी मृत्यू!
- नवी दिल्ली: काँग्रेसशासित कर्नाटकात खळबळ: एसआयआर (SIR) प्रक्रियेनंतर अंतिम मतदार यादी जाहीर, तब्बल १ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली!
- गोवा: भाजप अध्यक्ष नितीन नबीन दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर; बैठकांचा धडाका लावत मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांना दिले महत्त्वाचे मार्गदर्शन!



























Subscribe to my channel




