ऊर्जेचा जागतिक भूगोल बदलत आहे. त्यासोबतचऔद्योगिक क्षमता व राष्ट्रीय शक्ती यांमधील संबंधहीअधिक घट्ट होत आहेत. अनेक दशके भारताने ऊर्जेच्याराजकारणात स्वतःला एक कमकुवत ग्राहक म्हणूनचपाहिले. आपल्या वाढत्या अर्थव्यवस्थेला आयात कच्च्यातेलाची गरज होती. पण पश्चिम आशियात होणारे संघर्षतेलाचे भाव वाढवणारे व पुरवठ्यात अडथळा आणणारेठरत असत. ही कमजोरी आजही कायम आहे. पणयादरम्यान भारत तेल शुद्धीकरण व पेट्रोलियमउत्पादनांच्या क्षेत्रात मोठी ताकद बनून समोर आला. यायशाला रणनीतिक चर्चेत अजूनही पुरेसे महत्त्व दिले जातनाही. रिलायन्स जामनगरमध्ये रोज 14 लाख बॅरल कच्च्यातेलाचे शुद्धीकरण करू शकते. एकाच ठिकाणी असलेलाहा जगातील सर्वात मोठा रिफायनिंग परिसर आहे. पणयाचे महत्त्व एवढ्यापुरतेच मर्यादित नाही. प्रगततंत्रज्ञानामुळे येथे विविध प्रकारच्या कच्च्या तेलावरप्रक्रिया केली जाऊ शकते. यात जास्त सल्फर व जडकच्चे तेलही समाविष्ट आहे. त्याला उपयुक्त व मौल्यवानइंधनात बदलणे अनेक रिफायनरीजसाठी कठीण असते.युद्ध आणि निर्बंधांमुळे पुरवठ्याचे प्रस्थापित मार्ग बंदहोतात. तेव्हा विविध प्रकारच्या कच्च्या तेलावर प्रक्रियेचीही क्षमता अत्यंत महत्त्वाची ठरते. याच कारणामुळे तेलशुद्धीकरण क्षमतेलाही धोरणात्मक पायाभूत सुविधांचाएक भाग मानले पाहिजे. कच्चे तेल आणि डिझेलचा एक बॅरल समान नसतो. कच्च्या तेलाला आधी वाहतुकीद्वारे रिफायनरीपर्यंत पोहोचवावे लागते. मग त्यावर प्रक्रियाकरून पेट्रोलियम उत्पादने तयार केली जातात. विविध रिफायनरीज या इंधनांचे उत्पादन विविध प्रमाणातकरतात. कच्च्या तेलाचे साठे असण्याचा अर्थ असा नाहीकी डिझेलही उपलब्ध असेलच. तेलाचे उत्पादन सुरू असले, तरी शुद्धीकरण प्रक्रिया किंवा वाहतुकीतअडथळा आल्यास इंधनाची टंचाई निर्माण होऊ शकते. अमेरिकेला जामनगरमध्ये रस का आहे, हे यावरून आपल्याला समजू शकते. इराण युद्धाने निर्माण केलेल्या परिस्थितीचा आणि व्हेनेझुएलातील तेलाच्या साठ्यांचा एकत्र एक समीकरण आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनीरिलायन्सने व्हेनेझुएलाच्या कच्च्या तेलाचे अधिकप्रमाणात शुद्धीकरण करावे, यात उत्सुकता दाखवली.त्यांनी व्हेनेझुएलातील तेल उत्पादनात रिलायन्सच्यासंभाव्य सहभागावरही चर्चा केली. व्हेनेझुएलात तेल उत्पादन वाढल्यास अमेरिकेच्या पुरवठा स्रोतांमध्ये विविधता येऊ शकते. रिलायन्सला स्पर्धात्मक दरात भारताच्या रिफायनरीसाठी योग्य कच्चे तेलमिळाल्यास कामकाजातही लवचिकता येऊ शकते.अर्थात, या शक्यता प्रत्यक्षात येणे हे व्यावसायिक अटी व राजकीय परिस्थितीवर अवलंबून आहे. जामनगरमधील उत्पादन अनिश्चित काळासाठी वाढवतायेत नाही. रिफायनरीज चालवण्याच्या स्वतःच्या तांत्रिकमर्यादा असतात. कच्च्या तेलाची खरेदी ही त्याच्याकिमती, वाहतुकीचा खर्च, करार व निर्बंधांवर अवलंबूनअसते. भारत इंधनाची उपलब्धता कायम ठेवण्यास वबाजारावरील ताण कमी करण्यास मदत करू शकतो. पणतो जगातील तेलाचे दर ठरवू शकत नाही. तेलाचे उत्पादन, मागणी, वाहतूक व भू-राजकीयघडामोडी या बाबतीत निर्णायक असतात. रशियाशीजोडलेला पैलू अमेरिकन धोरणातील अंतर्गत विरोधाभासउघड करतो. युक्रेन युद्धानंतर भारताने सवलतीच्या दरातरशियन तेल खरेदी केले. कारण भारतासाठी परवडणाऱ्या दरात तेलाची उपलब्धताव पुरवठ्याची सुरक्षा गरजेची होती. अमेरिकेने निर्बंधांचादबाव आणून व कर लावण्याच्या धमक्या देऊन यावरआक्षेप घेतला. पण आता तोच अमेरिका भारताच्या तेलशुद्धीकरण क्षमतेचे धोरणात्मक महत्त्व मान्य करत आहे. हेअमेरिकन धोरणातील परस्परविरोधी प्राधान्यक्रमांनादर्शवते. विरोधकांवर दबाव आणणे व व्यावसायिकसंधींचा फायदा घेत देशांतर्गत बाजारात किमती स्थिरठेवणे. भारताला या सर्व विरोधाभासांच्या मध्येच मार्गकाढावा लागेल. प्रत्येक गोष्टीला विचार न करता विरोधकरणे िकंवा न सांगता सर्व मागण्या मान्य करणेही योग्यनाही. गरज आहे ती धोरणात्मक धैर्याने व्यावहारिकपातळीवर लवचिकता स्वीकारण्याची. धोरणात्मकस्वायत्ततेचा अर्थ असा नाही की भारताने भूमिकेत बदलकरण्यास नकार द्यावा. याचा खरा अर्थ हा आहे की,आपल्याला कधी, कुठे व कसा बदल करायचा आहे,याचे स्वातंत्र्य स्वतःकडे ठेवणे. आंतरराष्ट्रीय स्तरावरभारताचा प्रभाव आता अशा क्षमतेवर वेगाने अवलंबूनअसेल. पर्याय शोधणे इतर देशांसाठी कठीण आहे. चीनने उत्पादन क्षेत्रात आपली शक्ती वाढवून हेच केलेहोते. ऊर्जेच्या राजकारणाचा व्याप आता केवळ कच्च्यातेलाच्या खरेदीपुरता मर्यादित नाही. यात गुंतवणूक,तंत्रज्ञान व उत्पादनही समाविष्ट आहे. भारतात जामनगरव्यतिरिक्त वाडीनार, कोची, पारादीप, पानिपत व मंगळुरूयेथेही तेल रिफायनरीज आहेत. या सर्व रिफायनरीजआंतरराष्ट्रीय इंधन पुरवठा साखळीत स्थिती अधिकमजबूत करू शकतात. केवळ जामनगरच नाही तरआपल्या संपूर्ण तेल शुद्धीकरण उद्योगासमोर मोठ्या संधीआहेत. देशासमोर मोठ्या संधी...भारतात जामनगर व्यतिरिक्तवाडीनार, कोची, पारादीप, पानिपत वमंगळुरू येथेही तेल रिफायनरीजआहेत. त्यांच्या क्षमतेचा विस्तार केलाजात आहे. या सर्व मिळून आंतरराष्ट्रीयइंधन पुरवठा साखळीत भारताचीस्थिती मजबूत करू शकतात.जामनगरच नाही, तर भारताच्या संपूर्णतेल शुद्धीकरण उद्योगासमोर मोठ्यासंधी आहेत.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: पक्ष बदलणाऱ्यांना माफ करणार नाही; मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मतपेट्या उघडताच नेत्यांना जाब विचारणाऱ्या संतापजनक चिठ्ठ्या बाहेर!
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मोठा फेरबदल! "मी प्रस्थापित गिळलाय, १८ वर्षांचा दुष्काळ संपवलाय"; सतीश चव्हाण पराभवाच्या उंबरठ्यावर असताना रविकिरण (रविराज) साबळेंचा घणाघात
- पुणे: पर्यावरणाला धोका खरा, पण पत्ता चुकीचा! टोरंट पॉवरचा प्रकल्प भीमाशंकरमध्ये नव्हे तर १५ ते २० किमी अंतरावर कर्जतमध्ये
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- पुणे: अजितदादांच्या अपघातामागचं सत्य हा लाखो नागरिकांच्या विश्वासाचा प्रश्न, अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशी व पारदर्शकतेवर जय पवारांची महत्त्वपूर्ण भूमिका
- कोल्हापुर: ऊस दर आंदोलनाचा भडका! मिणचे-तासगाव मार्गावर चालकाला खाली ओढत उसाचा ट्रॅक्टर पेटवला, १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल
- सातारा: फलटण-लोणंद महामार्गावर भीषण अपघात! उसाच्या ट्रॅक्टरची धडक बसून २० वर्षीय तरुणाचा मृत्यू, वडिलांच्या निधनानंतर अडीच महिन्यांतच कुटुंबावर पुन्हा दुःखाचा डोंगर
- छत्रपती संभाजीनगर: पक्ष बदलणाऱ्यांना माफ करणार नाही; मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मतपेट्या उघडताच नेत्यांना जाब विचारणाऱ्या संतापजनक चिठ्ठ्या बाहेर!
गुन्हा
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
- पुणे: भरवस्तीत तरुणीला बळच उचलून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ, संतापलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून दिला पोलिसांच्या हातांत
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: विक्रोळीतील २१ वर्षीय विद्यार्थी कुशाग्र पटालेचा दुचाकी-टॅक्सी अपघातात दुर्दैवी मृत्यू!
- नवी दिल्ली: काँग्रेसशासित कर्नाटकात खळबळ: एसआयआर (SIR) प्रक्रियेनंतर अंतिम मतदार यादी जाहीर, तब्बल १ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली!
- गोवा: भाजप अध्यक्ष नितीन नबीन दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर; बैठकांचा धडाका लावत मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांना दिले महत्त्वाचे मार्गदर्शन!
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार रात्री उशिरा सुप्रीम कोर्टात पोहोचले; प्रतिज्ञापत्रातून मांडली सविस्तर भूमिका!



























Subscribe to my channel




