पुणे कोर्टाचा मोठा दिलासा! साखर संकुल तोडफोड प्रकरणी शेतकरी नेते राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांचे अटक वॉरंट रद्द!

 

पुण्यातील शिवाजीनगर येथील 'साखर संकुल' इमारतीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या हिंसक आंदोलन व तोडफोड प्रकरणातील गुन्ह्यामध्ये पुणे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी आमदार सदाभाऊ खोत यांना मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणी न्यायालयात नियमित सुनावणीस गैरहजर राहिल्यामुळे दोघांविरुद्ध जारी करण्यात आलेले गैरजमीनपात्र अटक वॉरंट (Non-Bailable Arrest Warrant) अखेर न्यायालयाने रद्द केले आहे. या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीत आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

काय होते नेमकं साखर संकुल तोडफोड प्रकरण?

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी (FRP - रास्त आणि किफायतशीर भाव) व उसाची पहिली उचल वेळेवर मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुण्यातील साखर आयुक्तालय असलेल्या 'साखर संकुल' कार्यालयावर भव्य मोर्चा व आंदोलन काढले होते. या आंदोलनादरम्यान संतप्त कार्यकर्त्यांनी प्रशासकीय कार्यालयावर निदर्शने करत तोडफोड केली होती. याप्रकरणी शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

न्यायालयातील कायदेशीर घडामोडी व सुनावणी:

या प्रकरणावर पुण्यातील न्यायालयात सुनावणी सुरू असताना, वारंवार समन्स बजावूनही न्यायालयात उपस्थित न राहिल्यामुळे न्यायालयाने राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्याविरोधात वॉरंट जारी केले होते. त्यानंतर दोघा नेत्यांच्या वकिलांनी न्यायालयात उपस्थित राहून गैरहजेरीचे रास्त कारण स्पष्ट केले आणि वॉरंट रद्द करण्यासाठी अर्ज सादर केला. न्यायालयाच्या अटी व शर्तींचे पालन करण्याची ग्वाही दिल्यानंतर न्यायदंडाधिकाऱ्यांनी हे अटक वॉरंट रद्द करण्याचा निर्णय दिला. या निर्णयामुळे दोन्ही नेत्यांवरील अटकेची टांगती तलवार टळली आहे.

 

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *