पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:अन्न केवळ बाजारातील वस्तू नाही, त्यावर मानसिक आरोग्यही टिकून

आजकाल बाजारात अन्नाची जी दुर्दशा झाली आहे, ती मान्य करायला नवी पिढी तयार नाही. पूर्वी म्हटले जायचे की अनोळखी हातांनी बनवलेले अन्न खाऊ नये. कारण आपल्या संस्कृतीत अन्नाला देव मानले आहे व त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होतो. पण शिकलेसवरलेले लोक हे नाकारतात. ‘याने काय फरक पडतो?’ असे ते म्हणतात. आज संपूर्ण जगात 12 अब्ज लोकांसाठी अन्नाचे उत्पादन होते आणि लोकसंख्या जवळपास 8 अब्ज आहे. असे असूनही 86 कोटी लोक उपाशी झोपत आहेत. आता यावर सुशिक्षित लोक काय म्हणणार? भारतात 40% अन्न वाया जाते. हे काही सुशिक्षितांचे लक्षण नाही. तुम्ही अन्नाची शुद्धता आध्यात्मिक दृष्टिकोनातून स्वीकारत नाही. स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतली जात आहे. सेंद्रिय भाज्या, सेंद्रिय अन्न याची मोठी चर्चा आहे, पण अन्न बनवणाऱ्याच्या मानसिकतेचा विचार करणेच आपण सोडून दिले आहे. मात्र मानसिक आरोग्य त्याच गोष्टीवर टिकून असते. अन्नाला बाजारातील वस्तू न मानता, ती मानसिक आरोग्यासाठी औषध म्हणून स्वीकारायला हवी.

This post was originally published on this site.



महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *