दक्षिण सोलापुरातील बंकलगी येथे गॅस सिलिंडरच्या स्फोटात कोळी कुटुंबाचे घर जळून खाक; एम.के. फाऊंडेशनचे प्रमुख महादेव कोगनुरे यांनी केली पाहणी व सांत्वन

सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील बंकलगी येथे गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाल्याची एक अत्यंत दुःखद दुर्घटना घडली आहे. या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत बसवराज गोविंद (ढोणज) कोळी यांच्या कुटुंबाचे संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. आगीच्या या दुर्घटनेत कोळी कुटुंबाचा संपूर्ण संसार क्षणार्धात आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक व मानसिक संकट ओढवले आहे.

घटनेची माहिती मिळताच एम. के. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा 'सागर सिमेंट'चे महाराष्ट्र हेड महादेव कोगनुरे यांनी तातडीने या दुर्घटनेची दखल घेतली. त्यांनी स्वतः बंकलगी येथे जाऊन पीडित कोळी कुटुंबाची भेट घेतली. तसेच कुटुंबाचे सांत्वन करत त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले व या संकटकाळात धीर दिला. स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या दुःखाच्या प्रसंगी बाधित कुटुंबाला मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन केले आहे.

 



गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *