Rajpal Yadav Video : बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव सध्या 9 कोटी रुपयांच्या चेक बाउन्स प्रकरणामुळे चर्चेत आहे. या प्रकरणात त्याला अटक झाली होती; मात्र आता जामिनावर त्याची तिहार जेलमधून सुटका झाली आहे. सुटका होताच तो थेट आपल्या भाचीच्या लग्नात सहभागी झाला आणि कुटुंबीयांसोबत सर्व जबाबदाऱ्या सांभाळताना दिसला.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राजपाल यादव धोती-कुर्ता परिधान करून हलवायांसोबत बसून रोटी लाटताना दिसत आहे. साधेपणाने काम करतानाचा त्याचा हा अंदाज पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले तर अनेकांनी त्याच्या जमिनीवरच्या स्वभावाचे कौतुक केले.
माहितीनुसार, लग्नसमारंभात उपस्थित असलेल्या हलवायांनी त्याच्यासोबत फोटो काढण्याची विनंती केली. त्यावर राजपाल यादवने केवळ फोटोच नाही तर त्याच्या सोबत कामही करू असे सांगितले. त्यानंतर त्याने प्रत्यक्ष रोटी लाटून सर्वांना सुखद धक्का दिला.
बालपणातील संघर्षांची आठवण
एनडीटीव्हीशी खास संवाद साधताना राजपाल यादवने आपल्या शालेय जीवनाची झलक दाखवली. तो मूळचा शाहजहांपुर येथील असून त्याने संविलियन विद्यालय कुंडरा येथे शिक्षण घेतले. लहानपणी तो पुस्तकांसाठी पैसे मिळवण्यासाठी दूध विकायचा अशी माहिती त्याने दिली. संघर्षातून पुढे आलेल्या या कलाकाराने आजही साधेपणा जपला आहे हे त्याच्या वागण्यातून दिसून येते.
जेलमधून सुटल्यानंतर आयएएनएसशी बोलताना राजपाल यादव म्हणाला की, तो नेहमीच न्यायालयाच्या शरण गेला आहे आणि पुढेही तसेच राहील. उच्च न्यायालय जो निर्णय देईल, त्याचे तो पूर्ण पालन करेल. सोशल मीडियावर आणि इतर माध्यमांतून साथ देणाऱ्या सर्व चाहत्यांचे त्याने मनःपूर्वक आभार मानले. भारतीय सिनेमा ही त्याची कर्मभूमी असल्याचेही त्याने सांगितले.
भतीजी की शादी में रोटी बनाते दिखे राजपाल यादव
राजपाल यादव अपनी भतीजी की शादी में हलवाइयों के साथ मिलकर रोटी बनाते नजर आए#RajpalYadav pic.twitter.com/PmEbCCntq7
— NDTV India (@ndtvindia) February 20, 2026
कर्ज प्रकरणाची पार्श्वभूमी
राजपाल यादवने अता पता लापता या चित्रपटाच्या निर्मितीसाठी सुमारे 9 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचा दावा आहे. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला आणि आर्थिक अडचणी वाढल्या. काही रक्कम परतफेड केली गेली असली तरी उर्वरित रकमेमुळे प्रकरण न्यायालयात गेले.
सध्या तो जामिनावर मुक्त असून पुढील सुनावणीची प्रतीक्षा करत आहे. दरम्यान, भाचीच्या लग्नातील त्याचा साधेपणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. संकटाच्या काळातही जमिनीशी नाळ जोडून ठेवणारा कलाकार म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



