पुणे: शहरातील सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांना (STP) जोडणाऱ्या मोठ्या व्यासाच्या मलवाहिन्यांच्या (ट्रंक लाईन) स्वच्छता आणि देखभाल-दुरुस्तीसाठी पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या निविदा काढून भरमसाठ खर्च केला जातो. मात्र, प्रत्यक्षात आजही शहरातील विविध नाल्यांमधून रोज कोट्यवधी लिटर सांडपाणी थेट नदीत वाहत असल्याने या मलवाहिन्यांच्या कामांवर आणि महापालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. प्रशासनाकडून कामांवर कोणतेही काटेकोर नियंत्रण किंवा देखरेख ठेवले जात नसल्यामुळे प्रत्यक्ष काम न करताच केवळ कागदावर बिले लाटण्याचे प्रकार वर्षानुवर्षे अविरत सुरू आहेत. परिणामी, शुद्धीकरण प्रकल्पांना आवश्यक तेवढे सांडपाणी वेळेवर मिळत नसल्यामुळे पुण्यातील ऐतिहासिक मुळा-मुठा नदीची अक्षशः 'गटारगंगा' झाली आहे.
कोट्यवधींचा खर्च आणि प्रत्यक्षात नदीची बिकट अवस्था: पुण्यातील सांडपाणी व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि मुळा-मुठा नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो. मात्र, प्रत्यक्षात शहरात टाकण्यात आलेल्या मलवाहिन्यांचे निकृष्ट दर्जाचे काम, ठिकठिकाणी झालेली गळती आणि देखभाल-दुरुस्तीमधील अनास्था यामुळे सांडपाणी वाहून नेणाऱ्या मुख्य वाहिन्या कुचकामी ठरल्या आहेत. परिणामी, मैलायुक्त पाणी जसेच्या तसे नदीपात्रात मिसळत असून नदीचे प्रदूषण दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालले आहे.
देखभाल आणि दुरुस्तीच्या नावाखाली निधीची उधळपट्टी: मलवाहिन्यांची स्वच्छता आणि दुरुस्ती करण्यासाठी दरवर्षी काढल्या जाणाऱ्या कंत्राटांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक उधळपट्टी होत असल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्ष जमिनीवर कोणतेही भरीव काम होत नसताना ठेकेदार आणि संबंधित यंत्रणांच्या संगनमताने लाखो-कोटी रुपयांची बिले पास केली जात आहेत. या भ्रष्ट कारभारामुळे एका बाजूला पुणेकरांच्या कष्टाच्या पैशांची उधळपट्टी होत आहे, तर दुसऱ्या बाजूला नदीचे सौंदर्य आणि पर्यावरण पूर्णपणे नष्ट होत चालले आहे. पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमधून या मुद्द्यावर तीव्र संताप व्यक्त होत असून, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
शहर
- मुंबई: एफडीए (FDA) मधून तुकाराम मुंढेंची बदली? सोशल मीडियावरील चर्चांवर सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी स्वतःच केला मोठा खुलासा!
- मुंबई: ओ मुंडे काका, आमचा वडापाव सुरू करा ना; विद्यार्थ्याच्या निरागस मागणीवर आयएएस अधिकारी तुकाराम मुंडेंचे प्रेरणादायी उत्तर
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
महाराष्ट्र
- पुणे: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी महेश सूर्यवंशी यांची एकमुखी निवड! २०२६ ते २०३१ साठी स्वीकारली धुरा
- मुंबई: एफडीए (FDA) मधून तुकाराम मुंढेंची बदली? सोशल मीडियावरील चर्चांवर सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी स्वतःच केला मोठा खुलासा!
- बारामती: विजय राष्ट्रवादीचा, कसोटी सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाची..! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीचे संपूर्ण राजकारण आणि सविस्तर विश्लेषण
- मुंबई: ओ मुंडे काका, आमचा वडापाव सुरू करा ना; विद्यार्थ्याच्या निरागस मागणीवर आयएएस अधिकारी तुकाराम मुंडेंचे प्रेरणादायी उत्तर
गुन्हा
- बीड: अहिल्यानगर महामार्गावरील कासार ओढ्यात आढळला निर्वस्त्र व दाढी वाढलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; आष्टी परिसरात उडाली खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- नवी मुंबई: अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस'खाली स्थानबद्ध, तर उलवेतील कुख्यात गुंडाच्या टोळीवर 'मोक्का' दाखल
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: सुटकेनंतर ध्रुव राठीचा धक्कादायक खुलासा ;पोलिसांनी माफी मागितली, सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण ते डिटेंशन नव्हे तर अपहरण होतं!
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!

























Subscribe to my channel




