
Pune : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कायदेशीर नोटीस धाडण्यात आली आहे. लाडकी बहीण योजना राजकीय दृष्ट्या प्रेरित असून, केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लागू केली आहे, असा आरोप या नोटीसीतून करण्यात आला आहे.
पत्रकार-लेखक आणि राजकीय विश्लेषक विनय हर्डीकर यांनी अॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत ही नोटीस पाठवली आहे. लाडकी बहीण योजना राबवल्यामुळे महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य, आरोग्य आणि पोषणामध्ये दीड हजार रुपयांमध्ये कसे सुधारणार? हे सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी देखील या नोटीसीमधून करण्यात आली आहे.
या योजनेमुळे रोजगार निर्मिती होणार हा दावा पोकळ आणि निराधार आहे, असा आरोप देखील करण्यात आला आहे. येत्या पाच दिवसाच्या आत या नोटीसीला उत्तर द्यावं, असंही नमूद करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज्याचे मुख्य सचिव आणि महिला व बाल विकास मंत्रालयाला सुद्धा ही नोटीस पाठविण्यात आली आहे.
|
Mumbai Crime: तक्रार करायला गेला अन् परत आलाच नाही, तरुणासोबत पोलिस ठाण्यात नेमकं काय घडलं? |
त्यामुळे राज्य सरकारकडून या नोटीसीला नेमकं काय उत्तर दिलं जाणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर राज्यातील महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केली.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत. जवळपास २ कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून आतापर्यंत योजनेचे ३ हप्ते म्हणजेच ४५०० रुपये महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहे. आता पुढील हप्ता भाऊबीज सणाला दिला जाणार आहे. दुसरीकडे या योजनेवरून विरोधकांनी सरकारला जाब विचारण्यास सुरुवात केली आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे पैसे कुठून आणणार? यामुळे सरकारी तिजोरीवरील ताण वाढणार, असं विरोधकांचं म्हणणं आहे. सत्ताधाऱ्यांकडून देखील विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. दरम्यान, योजनेवरून आरोप प्रत्यारोप होत असताना दुसरीकडे वकील असीम सरोदे यांनी सरकारला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर दरवर्षी तब्बल ४६ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
यासाठी सरकारने रिझर्व्ह बँकेकडून ३ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीवर मोठा ताण पडला आहे. हे सत्य सरकार लपवत आहे, असे असीम सरोदे यांनी नोटीसी म्हटलं आहे. राज्य सरकारने जर विधानसभा निवडणूक झाल्यानंतर ही योजना सुरू केली असती आणि पुढील ५ वर्षे महिलांना लाभ दिला असता तर योजनेच्या हेतूवर शंका उपस्थित झाली नसती, असेही कायदेशीर नोटिसीत नमूद करण्यात आलं आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



