सिंधुदुर्ग: कणकवली पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या ३८ वर्षीय महिला पोलिस हवालदार स्मिता सचिन माने यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने संपूर्ण पोलिस दलात आणि कोकणात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्मिता माने यांचा मृतदेह रविवारी दुपारी बिडवाडी-हुंबरणे येथील जंगलमय भागात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी स्मिता यांच्या बहिणीने आणि माहेरच्या नातेवाइकांनी छळ व घातपाताचे गंभीर आरोप केल्यानंतर, कणकवली पोलिसांनी मध्यरात्री उशिरा त्यांचे पती तथा पोलिस कॉन्स्टेबल सचिन माने यांना अटक केली आहे.
दोन दिवसांपासून होत्या बेपत्ता; सामान आवरावर सुरू असताना अचानक घडला प्रकार: मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, स्मिता माने या गेल्या १८ वर्षांपासून सिंधुदुर्ग पोलिस दलात सेवेत होत्या. त्या आणि त्यांचे पती सचिन माने हे दोघेही कणकवली पोलिस ठाण्यात कार्यरत असून कलमठ-नाडकर्णीनगर येथे वास्तव्यास होते. नुकतीच या पती-पत्नीची कणकवली येथून वैभववाडी पोलिस ठाण्यात प्रशासकीय बदली झाली होती. त्यामुळे त्यांनी ८ आणि ९ ऑक्टोबर रोजी सुट्टी घेतली होती व नव्या ठिकाणी जाण्यासाठी गुरुवारी घरातील सामानाची आवराआवर करत होते. मात्र, शुक्रवारी सकाळपासून स्मिता माने अचानक घरातून गायब झाल्या. पती सचिन माने यांनी त्या बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दिली होती.
झाडाला गळफास, पण गुडघे जमिनीला टेकलेले; घातपाताचा संशय: रविवार, ११ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास बिडवाडी-हुंबरणे येथील जंगलात स्थानिक ग्रामस्थांना झाडाला लटकलेला मृतदेह दिसला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची पाहणी केली असता तो बेपत्ता स्मिता माने यांचा असल्याचे निष्पन्न झाले.
मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत असला तरी त्यांचे दोन्ही गुडघे जमिनीला पूर्णपणे टेकलेले होते. त्यामुळे हा केवळ आत्महत्येचा प्रकार नसून घातपात किंवा हत्या करून मृतदेह लटकवण्यात आला असावा, असा तीव्र संशय व्यक्त केला जात आहे.
कुटुंबाचा आक्रोश आणि पतीवर गंभीर आरोप: स्मिता माने यांच्या मृत्यूची माहिती मिळताच त्यांच्या माहेरच्या नातेवाइकांनी व वडिलांनी कणकवली पोलिस ठाण्यात धाव घेत प्रचंड आक्रोश केला. स्मिता यांच्या बहिणीने व माहेरच्या मंडळींनी पती सचिन माने यांच्यावर कौटुंबिक त्रास, शारीरिक व मानसिक छळ आणि मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे गंभीर आरोप केले. या तक्रारीनंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करणे व छळवणुकीच्या कलमांखाली गुन्हा दाखल करत पती सचिन माने यांना मध्यरात्री ताब्यात घेऊन अटक केली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रकरणाचा सखोल तपास: घटनेचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी आणि कणकवली पोलिस ठाण्याला भेट देऊन तपासाची चक्रे वेगाने हलवली आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून फॉरेन्सिक टीमची मदत घेतली जात आहे. स्मिता माने यांच्या पश्चात पती, एक लहान मुलगा व सासरचे नातेवाईक असा परिवार आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात शोकाकूल वातावरण पसरले आहे.
शहर
- पुणे: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी महेश सूर्यवंशी यांची एकमुखी निवड! २०२६ ते २०३१ साठी स्वीकारली धुरा
- मुंबई: एफडीए (FDA) मधून तुकाराम मुंढेंची बदली? सोशल मीडियावरील चर्चांवर सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी स्वतःच केला मोठा खुलासा!
- मुंबई: ओ मुंडे काका, आमचा वडापाव सुरू करा ना; विद्यार्थ्याच्या निरागस मागणीवर आयएएस अधिकारी तुकाराम मुंडेंचे प्रेरणादायी उत्तर
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
महाराष्ट्र
- पुणे: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी महेश सूर्यवंशी यांची एकमुखी निवड! २०२६ ते २०३१ साठी स्वीकारली धुरा
- मुंबई: एफडीए (FDA) मधून तुकाराम मुंढेंची बदली? सोशल मीडियावरील चर्चांवर सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी स्वतःच केला मोठा खुलासा!
- बारामती: विजय राष्ट्रवादीचा, कसोटी सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाची..! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीचे संपूर्ण राजकारण आणि सविस्तर विश्लेषण
- मुंबई: ओ मुंडे काका, आमचा वडापाव सुरू करा ना; विद्यार्थ्याच्या निरागस मागणीवर आयएएस अधिकारी तुकाराम मुंडेंचे प्रेरणादायी उत्तर
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- नवी मुंबई: अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस'खाली स्थानबद्ध, तर उलवेतील कुख्यात गुंडाच्या टोळीवर 'मोक्का' दाखल
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: सुटकेनंतर ध्रुव राठीचा धक्कादायक खुलासा ;पोलिसांनी माफी मागितली, सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण ते डिटेंशन नव्हे तर अपहरण होतं!
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
























Subscribe to my channel




