अमरावतीः अकोल्यात एका नागरिकाला लुटून महागडी कार आणि मोबाईल पळवून नेणाऱ्या सराईत गुन्हेगाराने पोलिसांच्या हातावर तुरी देण्यासाठी थरारक प्रयत्न केला. अमरावती शहर पोलिसांनी नाकाबंदी केली असता आरोपीने चक्क टोलनाका तोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला, एवढेच नव्हे तर पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी त्याने चालत्या वाहनातून उडी मारून पळ काढण्याचाही प्रयत्न केला. मात्र, नांदगाव पेठ पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट एकच्या या संयुक्त आणि धाडसी कारवाईमुळे हा फिल्मी स्टाइल थरार अखेर आरोपीच्या अटकेने संपुष्टात आला. विकी शांताराम रोकडे (२५ वर्षे, रा. प्रभुत्व नगर, नाशिक) असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून वाहनदेखील जप्त करण्यात आले. रविवारी रात्री १० ते ११ च्या सुमारास हा थरार घडला.
पोलिसांच्या पथकाने तत्परता दाखवत केली नाकाबंदी
अकोलास्थित गोरेगाव-पातूर रोड येथून विकास मोकळे (रा. मोकडेवाडी, अकोला) यांच्यावर चार हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला. त्यांना गंभीर मारहाण करून जखमी केल्यानंतर आरोपींनी त्यांच्या ताब्यातील एमएच-३०/ बीडब्ल्यू - ६७९१ क्रमांकाची कार आणि दोन मोबाईल जबरदस्तीने हिसकावून अमरावतीच्या दिशेने पोबारा केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, अकोला स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने अमरावती शहर पोलिसांना सतर्क केले. या माहितीच्या आधारे नांदगाव पेठ टोलनाक्यावर गुन्हे शाखा युनिट एकचे प्रमुख दिनेश दहातोंडे व नांदगाव पेठचे ठाणेदार सतीश पाटील यांच्या नेतृत्वातील पोलिसांच्या पथकाने तत्परता दाखवत नाकाबंदी केली.
वाळकी डॅम परिसरात आरोपी जेरबंद
क्राईम युनिट एक व नांदगाव पेठ पोलिसांनी रविवारी ११ ऑक्टोबर रोजी रात्री १० च्या सुमारास ती चोरीची कार वेगात येताना दिसताच अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने पोलिसांना न जुमानता टोलनाका तोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस पथकाने अत्यंत धाडसाने पाठलाग केला. आरोपीने थेट चालत्या वाहनातूनच खाली उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला. परंतु, सतर्क पोलिसांनी शिताफीने पाठलाग करत वाळकी डॅम परिसरात त्या आरोपीला जेरबंद केले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून जबरी चोरी गेलेली ती महागडी कार आणि तब्बल पाच मोबाईल फोन जप्त केले आहेत. ताब्यात घेतलेला आरोपी आणि जप्त मुद्देमाल अकोला एलसीबी पथकाच्या सुपूर्द करण्यात आला. एपीआय दशरथ आडे व मनीष वाकोडे यांच्या टीमनेही कारवाई यशस्वी केली.
शहर
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
महाराष्ट्र
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- नवी मुंबई: अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस'खाली स्थानबद्ध, तर उलवेतील कुख्यात गुंडाच्या टोळीवर 'मोक्का' दाखल
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
























Subscribe to my channel



