अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं, अजित पवार यांच्या निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेमध्ये आहे. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात अनेक दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विलीनीकरणावर बोलताना मोठा दावा केला होता. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणानंतर अमोल कोल्हे हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होणार होते, तशी अजितदादा यांची देखील इच्छा होती. हे सर्व अमोल कोल्हे यांना माहिती आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं होतं. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील विलीनीकरणासंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला होता, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या, 12 तारखेला त्या संदर्भात घोषणा होणार होती, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं.
दरम्यान रोहित पवार यांच्या दाव्या नंतर शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना अमोल कोल्हे यांनी देखील मोठा दावा केला. त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यासंदर्भात बोलताना मोठा गौप्यस्फोट केला होता. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणानंतर छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाणार होते. असा दावा अमोल कोल्हे यांनी केला आहे. सध्या जनगनणेचं काम सुरू आहे, मात्र त्यामध्ये ओबीसीचा कॉलम नाहीये, अशा स्थितीमध्ये भुजबळांसारखा अभ्यासू नेता वरिष्ठ सभागृहात असायला हवा असं सर्वांना वाटत होतं, त्यासंदर्भात आमची अजितदादांसोबत चर्चा देखील झाली होती. त्याचवेळी बोलण्याच्या ओघात अजितदादा म्हणाले होते की, विलीनीकरणानंतर भुजबळ हे राज्यसभेवर जाऊ शकतात असा दावा कोल्हे यांनी केला होता.
दरम्यान आता नवी माहिती समोर येत आहे, ती म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणानंतर शरद पवार हे राजकारणातून अलिप्त होणार होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शरद पवार हे राजकारणातून अलिप्त होऊन सामाजिक कार्यात सक्रिय राहणार होते, अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. दोन्ही पक्षाच्या विलीनीकरणानंतर पक्षाची सर्व जबाबदारी अजित पवारांकडे येणार होती, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान शरद पवार यांचा राज्यसभेचा कार्यकाळ आता संपत आहे, मात्र शरद पवार यांनी पुन्हा राज्यसभेवर जावं अशी अजितदादा यांची इच्छा होती, अशी माहिती देखील समोर आली आहे.
शहर
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- महिला T20 विश्वचषक: भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण!
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
महाराष्ट्र
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
गुन्हा
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
देश विदेश
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!

























Subscribe to my channel




