मुंबई: दिंडोशीत माकडांचा उच्छाद! १९ व्या मजल्यवर पोहोचले माकड, वृंदावन सोसायटीचे रहिवासी त्रस्त; वनविभागाकडे कारवाईची मागणी

मुंबई: मालाड पूर्वेकडील न्यू दिंडोशी येथील 'वृंदावन सोसायटी' (शिवधाम कॉम्प्लेक्स परिसर) मध्ये गेल्या काही दिवसांपासून माकडांच्या वाढत्या आणि  वावराने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. माकडांच्या या सततच्या उपद्रवामुळे येथील स्थानिक नागरिक आणि रहिवासी अत्यंत त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, ही माकडे आता केवळ झाडांवर किंवा गच्चीवर फिरण्यापुरती मर्यादित न राहता, थेट रहिवाशांच्या घरांमध्ये शिरत आहेत आणि घरातील अन्नधान्यासह साहित्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी व नुकसान करीत आहेत, ज्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये एकच भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे.

या वाढत्या उपद्रवाचे गांभीर्य तेव्हा अधिक वाढले जेव्हा मंगळवारी सकाळी साधारण ८ वाजण्याच्या सुमारास, सोसायटीच्या तब्बल १९ व्या मजल्यावरील पॅसेजमध्ये एक माकड आरामात बसलेले रहिवाशांना आढळून आले. मुंबईसारख्या गजबजलेल्या आणि शहराच्या मध्यभागी असणाऱ्या भागात, एवढ्या अतिउंच मजल्यावर माकड पोहोचल्याचे पाहून नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली. या वाढत्या घटनांमुळे सोसायटीतील लहान मुले, वृद्ध नागरिक तसेच महिलांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, न्यू दिंडोशी येथील ही वृंदावन सोसायटी दिंडोशी फायर ब्रिगेडजवळ, मालाड पूर्व येथे स्थित असून ती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरालगत असल्याने या भागात वन्यप्राण्यांचा आणि माकडांचा वावर वारंवार पाहिला मिळतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून माकडांचा त्रास कमालीचा वाढला असून रहिवाशांचे जगणे मुश्किल झाले आहे. या गंभीर समस्येवर तातडीने तोडा काढण्यासाठी सोसायटीच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. रहिवाशांनी या संपूर्ण प्रकारची माहिती उद्धव सेनेचे स्थानिक आमदार सुनील प्रभू तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वन संरक्षक अनिता पाटील यांना दिली आहे.

परिसरातील या उपद्रवी माकडांना सुरक्षितपणे जेरबंद (पकडून) त्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी आक्रमक आणि हक्काची मागणी येथील त्रस्त रहिवाशांकडून वनविभागाकडे करण्यात आली आहे. नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता वनविभागाने या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, अशी तीव्र अपेक्षा रहिवाशांनी व्यक्त केली आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *