पुणे: एका सांस्कृतिक कार्यक्रमाच्या प्रसिद्धीचा मोबदला मागण्याच्या नावाखाली 65 वर्षीय निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याच्या घरात घुसून दहशत माजवल्याप्रकरणी वादग्रस्त सोशल मीडिया रीलस्टार दिव्या शिंदे हिच्या अडचणींत मोठी वाढ झाली आहे. ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करत तब्बल 5 लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप तिच्यावर असून, या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात दिव्या शिंदेसह तिचा साथीदार अण्णा ऊर्फ आप्पा ढमढेरे आणि इतर 8 ते 10 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
तक्रारदार डॉ. विद्याधर गायकवाड (वय 65) हे पुणे कॅन्टोन्मेंट रुग्णालयात मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून प्रदीर्घ सेवा बजावून निवृत्त झाले आहेत. सध्या ते 'करूणादीप फाउंडेशन'च्या सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत. या संस्थेच्या वतीने पुण्यातील प्रसिद्ध बालगंधर्व रंगमंदिरात 'कला आविष्कार महोत्सव' आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीचे काम केल्याचा दावा करत दिव्या शिंदे आणि तिच्या सहकाऱ्यांनी डॉ. गायकवाड यांच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी लावून धरली होती.
डॉक्टरांच्या निवासस्थानी बेकायदेशीरपणे प्रवेश
मात्र, ही रक्कम देण्यास डॉक्टरांनी नकार दिल्याने संशयितांनी थेट गुंडगिरी करत मारहाण करायला सुरुवात केली. तक्रारीनुसार, पैशांचा तगादा फेटाळल्याच्या रागातून दिव्या शिंदेने 8 ते 10 जणांच्या टोळक्यासह डॉक्टरांच्या निवासस्थानी बेकायदेशीरपणे प्रवेश केला. तिथे आरोपींनी घरात गोंधळ घालून सामानाची नासधूस केली आणि ज्येष्ठ नागरिक असलेल्या डॉ. गायकवाड यांना बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.
बिग बॉसमधून तडकाफडकी हकालपट्टी
सोशल मीडियावरील रील्समुळे प्रकाशझोतात आलेली दिव्या शिंदे ही यापूर्वीही आपल्या वादग्रस्त वर्तनामुळे चर्चेत राहिली आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात सहस्पर्धकांना धमकावल्याच्या गंभीर आरोपावरून फेब्रुवारी 2026 मध्ये तिची शोमधून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली होती. आता थेट एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या घरात घुसून खंडणी मागितल्याचे प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे. काळेपडळ पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, संबंधित आरोपींची चौकशी आणि पुढील कायदेशीर कारवाई वेगाने सुरू आहे.
शहर
- पुणे: गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांशी गप्पा मारताना अचानक चक्कर आल्याने पोलीस हवालदार दत्तात्रय तेलंगे यांचे हृदयविकाराने निधन
- पुणे: गणेश विसर्जन मिरवणूक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून तब्बल २६ ठिकाणी वाहन पार्किंगची जय्यत व्यवस्था!
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
महाराष्ट्र
- लातूर: पावसाने दिला धोका अन् डोक्यावर कर्जाचा डोंगर! लातूरच्या शिरूर अनंतपाळमध्ये नापिकीला कंटाळून ३३ वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
- नंदुरबार: प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या आणि नियम मोडणाऱ्या दोन खासगी बसेसवर मोठी कारवाई; आरटीओच्या वायुवेग पथकाकडून दंड वसूल!
- जालना: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी अन् हेक्टरी भरपाई द्या; मागण्या मान्य न झाल्यास पाटोद्यावरून मुंबईकडे कूच करण्याचा मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा
- गोवा:राजकारणात खळबळ मंत्री विश्वजित राणे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व इतर नेत्यांची भेट, दिल्लीत महत्त्वपूर्ण चर्चा!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!




























Subscribe to my channel




