Bhiwandi Mayor Election: भिवंडीत भाजपाला मोठा धक्का! महापौरपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट

महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही वर्षात चांगलीच उलथापालथ झाल्याचे पाहायला मिळते. यामुळे काही नवीन समीकरणं जुळत असल्याचे दिसत आहे.भिवंडी महापौरपदाच्या निवडणुकीत देखील असेलच काहीसे चित्र पाहायला मिळाले आहे. येथे भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भिवंडी महानगरपालिकेचे अधिकृत महापौर म्हणून नारायण चौधरी यांची निवड झाली आहे. भाजपच्या फुटीर गटाचे नारायण चौधरी यांना 48, शिवसेना पुरस्कृत कोणार्क विकास आघाडीचे विलास आर पाटील यांना 25 तर भाजपाच्या स्नेहा मेहुल पाटील यांना 16 मते मिळाली आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ( श. प.) यांच्या सेक्युलर फ्रंट च्या मदतीने भाजपा बंडखोर नारायण चौधरी महापौर पदी विजयी झाले आहेत.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *