पुणे: मुरुम चोरी पकडल्याचा राग; देऊळगाव राजे येथे तलाठ्याला राग अनावर, दोघांवर गुन्हा दाखल!

पुणे: देऊळगाव राजे (ता. दौंड) परिसरात अवैधरित्या मुरूम उत्खनन करून वाहतूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुरूम चोरीचा पंचनामा करीत असताना तलाठ्याला शिवीगाळ व दमदाटी करून सरकारी कामात अडथळा आणल्याचाही आरोप आहे.

महसूल विभागाला देऊळगाव राजे परिसरात मुरूम चोरी सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार देऊळगाव राजे-वडगाव दरेकर रस्त्यावर एमएच १४ एलआर ५५८७ क्रमांकाच्या हायवामधून रॉयल्टी न भरता मुरूम उत्खनन व वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. महसूल पथकाने मुरूम आणि भारतबेंझ कंपनीच्या दहा टायर हायवाचा पंचनामा केला. या मुद्देमालाची किंमत सुमारे १० लाख ३५ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

 

 

या कारवाईदरम्यान अंबादास शेळके (पूर्ण नाव माहीत नाही) आणि नरेंद्र दादा कोरे (दोघे रा. देऊळगाव राजे, ता. दौंड) यांनी तलाठी शुभांगी गुंड यांना शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच हाताच्या बाह्या सरसावून अंगावर धावून येत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तलाठी शुभांगी गुंड यांच्या फिर्यादीवरून दौंड पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस सागर म्हेत्रे करीत आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *