सातारा: पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील उंब्रजच्या भराव पुलावर उभ्या असलेल्या एका टेंपोला अचानक भीषण आग लागल्याची घटना आज, शुक्रवारी (दि. १८)दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. या अचानक लागलेल्या आगीमुळे महामार्गावर एकच खळबळ उडाली आणि काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित टेंपो चालकाने आपला टेंपो (क्रमांक MH 04 LQ 6816) पुलावर सातारा-कराड मार्गाच्या बाजूला उभा केला होता. यादरम्यान अचानक या वाहनाने पेट घेतला. पाहता पाहता आगीने उग्र रूप धारण केले आणि टेंपोच्या केबिनसह पाठीमागील बाजूस शिसे असलेल्या ॲल्युमिनियम प्लेटवर झाकलेल्या ताडपत्रीनेही वेगाने पेट घेतला.
महामार्गावर घडलेल्या या प्रकारामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले. टेंपोतून धुराचे लोट निघत असल्याचे लक्षात येताच उंब्रज परिसरातील जागरूक नागरिक आणि स्थानिक पोलीस तात्काळ मदतीसाठी घटनास्थळी धावून आले. अत्यंत बिकट परिस्थितीत दोघांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एक मोठा अनर्थ टळला. स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तात्काळ हालचाल करत जवळच असलेल्या एका बँकेतून आणि पेट्रोल पंपावरून उपलब्ध अग्निशामक यंत्रे (Fire Extinguishers) आणली आणि आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला.
परंतु आगीची तीव्रता अधिक असल्याने आग पूर्णपणे आटोक्यात येत नव्हती. त्यामुळे तातडीने स्थानिक पातळीवर पाण्याचे दोन टँकर घटनास्थळी बोलावण्यात आले. टँकरमधील पाण्याच्या पाण्याचा सतत मारा करून अखेर अथक प्रयत्नांनंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले आणि आग विझवण्यात आली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या आगीत टेंपोचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, हा टेंपो अचानक कसा पेट घेतला आणि आग लागण्याचे नेमके कारण काय होते, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आग विझवल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली, ज्यामुळे वाहनचालक आणि प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला.
शहर
- पुणे: वेळप्रसंगी स्वतःला विकेन, पण पैशांसाठी 'छत्रपती' कारखाना बंद पडू देणार नाही; अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांची अत्यंत भावनिक साद
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- मुंबई: गणपती दर्शनाहून परतताना अभिनेते सलमान खानची संतापजनक कृती; चाहत्याच्या पायावरून कार गेल्याने अभिनेत्याने चालकालाच लगावली थापड
- मुंबई: महापालिकेचा मोठा पर्यावरणपूरक निर्णय; गणपती विसर्जन झाल्यानंतर मुलूंडमध्ये पीओपीच्या मूर्तींवर केली जाणार पूर्णप्रक्रिया
महाराष्ट्र
- पुणे: वेळप्रसंगी स्वतःला विकेन, पण पैशांसाठी 'छत्रपती' कारखाना बंद पडू देणार नाही; अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांची अत्यंत भावनिक साद
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- मुंबई: गणपती दर्शनाहून परतताना अभिनेते सलमान खानची संतापजनक कृती; चाहत्याच्या पायावरून कार गेल्याने अभिनेत्याने चालकालाच लगावली थापड
- रत्नागिरी: राजापूर तालुक्यातील तळगाव येथे बेकायदेशीर दारू बॉटलिंग रॅकेटचा पर्दाफाश; कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक
गुन्हा
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!
- बिहार: गोड खाण्याचा आनंद ठरला शेवटचा! घशात रसगुल्ला अडकल्याने ८ वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू; हळहळ व्यक्त!
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!

























Subscribe to my channel




