पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:होकार-नकार लैंगिक नाही, तर नैतिक आधारावर असावेत

पूर्वी घरांमध्ये होकार आणि नकाराचा अधिकार फक्त मोठ्यांकडे असायचा. अनेकदा घरातील मोठी मंडळी फारसा विचार न करता हो किंवा नाही म्हणायची. तरीही त्याचे परिणाम चांगले आणि अनुकूल असायचे. मुलांचे संगोपन करताना कोणत्या गोष्टींना हो म्हणावे आणि कोणत्या गोष्टींना नाही, हीसुद्धा एक कला आहे हळूहळू काळ बदलला. भारतात सर्वाधिक नकार कुणी ऐकला असेल महिलांनी. माता-भगिनींना त्यांचे अधिकार व इच्छांबाबत खूप वेळा नकार ऐकावा लागतो. आजही 80% महिला आपल्या निर्णयांसाठी कुटुंबातील इतरांवर अवलंबून आहेत. ग्रामीण भागातील नोकरदार महिलांचे प्रमाण शहरी महिलांपेक्षा जास्त आहे. मुलांच्या आईकडे वडिलांपेक्षा जास्त घरकाम का असते? हा सगळा खेळ होकार- नकाराचा आहे. अनेक पुरुष मुलांच्या आईला शाळेतील पालक सभा किंवा डॉक्टरांची भेट यांसारख्या गोष्टींसाठीही नकार देतात. म्हणून आपण हे ठरवले पाहिजे की, हो किंवा नाही म्हणणे हे लैंगिक आधारे नाही तर नैतिक आधारे असावे.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *