NCERT | आता एनसीईआरटीच्या पुस्तकात मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा समावेश; इयत्ता 8 वीच्या पुस्तकात….

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अर्थात National Council of Educational Research and Training (एनसीईआरटी) यांच्या इयत्ता आठवीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकात मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा समावेश करण्यात आला आहे. या नव्या अभ्यासक्रमानुसार तिसरा धडा ‘मराठा साम्राज्याचा उदय’ या विषयावर आधारित असणार आहे. या धड्यात मराठा साम्राज्याची ‘अटक ते कटक’ आणि ‘पेशावर ते तंजावरपर्यंतची’ व्याप्ती दर्शविणारा नकाशा छापण्यात आला होता. मात्र या नकाशावर जैसलमेर घराण्याचे वंशज चैतन्यराज सिंह यांनी आक्षेप नोंदवला होता. त्यांच्या आक्षेपानंतर हिंदी आवृत्तीतील पुस्तकातून संबंधित नकाशा वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, इंग्रजी आवृत्तीत मात्र हा नकाशा कायम ठेवण्यात आल्याने या निर्णयाबाबत चर्चा सुरू झाली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *