Iran America Clash : इराण आणि अमेरिका यांच्यातील वाद अजूनही थांबण्याची चिन्हं दिसत नाहीयेत. हे दोन्ही देश एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. अमेरिका तेथील सरकार उलथवून लावण्याच्या प्रयत्नात आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले सैन्य तैनात केले असून कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. असे असतानाच आता अमेरिकेचा इराणवरील हल्ल्याचा प्लॅन ठरला आहे. सोबतच अमेरिका इराणमधील अनेक दिग्गज नेत्यांना ठार करण्याच्या प्लॅन करत आहे. त्याबाबतचा विस्तृत प्लॅनही ठरला असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता लवकरच मोठं काहीतरी घडणार असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
अमेरिका अनेक ठिकाणी हल्ला करण्याच्या तयारीत
रशिया टुडेने वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टचा हवाला देत याबाबतचे वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणविरोधात करावयाच्या कारवाईबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सोबतच सैन्य करावाई कशी केली जाईल, हेही ट्रम्प यांना सांगण्यात आले आहे. इराणचा अणुकार्यक्रम, इराणच्या बॅलिस्टिक मिसाईल्स अशा ठिकाणी हल्ला करणे तसेच इराणच्या सरकारवर वेगवेगळ्या मार्गांनी दबाव वाढवण्याचाही समावेश अमेरिकेच्या प्लॅनमध्ये आहे.
अमेरिकेचा नेमका प्लॅन काय?
मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेने इराणमध्ये सत्तांतर घडवून आणण्यासाठी एक प्लॅन तयार केला आहे. या प्लॅननुसार इराणमधील अनेक राजकीय नेते, सैन्यातील अधिकाऱ्यांना लक्ष्य केले जाऊ शकते. त्यांना थेट यमसदनी पाठवण्याचा अमेरिकेचा प्ल्रन आहे. सोबतच सध्याच्या खामैनी सरकारलाही उलथवून लावण्यासाठी अमेरिकेने प्लॅन तयार केला आहे. इराणमधील इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे प्रमुख कमांडर तसेच प्रशासनातील उच्चाधिकाऱ्यांनाही टार्गेट केले जाऊ शकते. अमेरिका आपल्या प्लॅननुसार इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामैनी, राष्ट्रपती मसूद पेजेक्शियान, परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांच्यावरही हल्ला केला जाऊ शकतो, असे म्हटले जात आहे. दरम्यान, अमेरिकेचा हा कथित प्लॅन समोर आल्यानंतर भविष्यात नेमकं काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शहर
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
महाराष्ट्र
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती


























Subscribe to my channel
