
Pune : पुणे जिल्ह्यातील किल्ले शिवनेरी येथे शिवजयंतीनिमित्त मोठ्या संख्येने शिवभक्तांनी रात्रीपासूनच गर्दी केली होती. त्यामुळे गडावर मोठी चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घटना घडली. गडावर जाणाऱ्या मार्गावर भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. दरम्यान, प्रवेशद्वाराजवळ अचानक ढकलाढकली सुरू झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत काही शिवभक्त किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून त्यांना तात्काळ उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच या चेंगराचेंगरीत महिला व लहान मुलही जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस व आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे. सध्या गडावर गर्दीचे नियोजन करण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासनाकडून शिवभक्तांना संयम राखण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या घटनेमुळे शिवजयंती उत्सवाला गालबोट लागलं आहे.
अनेक नागरिक किरकोळ जखमी
अंबरखाण्याच्या खालच्या हत्ती दरवाजा परिसरात तसेच गणेश दरवाजा या अरुंद मार्गांवर नागरिकांची प्रचंड गर्दी झाली. रस्ते अरुंद असल्याने आणि एकाचवेळी मोठ्या संख्येने भाविक पुढे सरकल्याने चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. या घटनेत काही महिला व लहान मुलांसह अनेक नागरिक किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
जखमींवर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू
जखमींना तातडीने जुन्नर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या घटनेमुळे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. शिवजयंतीसारख्या मोठ्या उत्सवावेळी दरवर्षी मोठी गर्दी होत असल्यानं भविष्यात योग्य गर्दी नियंत्रण, प्रवेश-निर्गमन मार्गांचे नियोजन आणि पुरेसा पोलीस बंदोबस्त हा अगोदरच्या दिवसांपासूनच गडावर ठेवणं गरजेचं आहे.
पोलिस बंदोबस्त नसल्याचा आरोप
ज्यावेळी गर्दी वाढत होती, त्यावेळी गर्दी नियंत्रणात करण्याचा प्रयत्न उपस्थित पोलिसांनी केला. पण गर्दी अधिक असल्याने चेंगराचेंगरी झाली. या गर्दीत लहाने मुले आणि महिला देखील होत्या. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर जखमींना प्रशासनाकडून रूग्णालयात दाखल करण्यात आले. आज सकाळपासूनच शिवजयंतीनिमित्त लोक घराबाहेर पडताना दिसत आहेत.
शहर
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती























Subscribe to my channel

