गोंदिया-बाळाघाट मार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू, रोजगाराच्या शोधात होते कुटुंब!

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवर असलेल्या गोंदिया जिल्ह्यात एक अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण अपघात घडला आहे. गोंदिया-बाळाघाट राज्यमार्गावर एका भरधाव ट्रक आणि ऑटो रिक्षा यांच्यामध्ये झालेल्या जोरदार धडकेत ऑटोमधील एकूण ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असून, एकाच कुटुंबातील सर्व सदस्य असल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, ऑटो रिक्षाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील रहिवासी असलेले एक कुटुंब आपल्या रोजगाराच्या शोधात एका ऑटो रिक्षाने (MH 35 F 6332) मध्य प्रदेशातील बालाघाटच्या दिशेने प्रवास करत होते. गोंदिया-बाळाघाट मार्गावरील परसवाडा फाट्याजवळ समोरून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने (RJ 46 GA 9233) ऑटोला जोरदार धडक दिली. या अपघातात ऑटोमधील सहाही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. मृतांची अद्याप अधिकृत ओळख पटलेली नाही, मात्र ते सर्व एकाच कुटुंबातील असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. रोजगाराच्या शोधात घराबाहेर पडलेल्या या कुटुंबावर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत सर्वांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *