सध्या निवडणुका पार पडल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यात पुन्हा नवा वाद सुरु झाला आहे. धनंजय मुंडे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावेळी जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना जाहीर इशारा दिला आहे. “माझा काहीच मॅटर नाही. मी केलेल्या प्रत्येक आरोपांवर जर फौजदारी खटले दाखल केले ना, तर माझ्याविरोधात बोलणाऱ्यांना त्यांचं संपूर्ण आयुष्य जेलमध्ये काढावं लागेल, हे लक्षात ठेवा,” अशा कडक शब्दात त्यांनी सुनावले आहे.
मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे. माझा काहीच मॅटर नाही. मी केलेल्या प्रत्येक आरोपांवर जर फौजदारी खटले दाखल केले ना, तर माझ्याविरोधात बोलणाऱ्यांना त्यांचं संपूर्ण आयुष्य जेलमध्ये काढावं लागेल. हे लक्षात ठेवा. मी याबद्दल आणखी काही कारवाई केलेली नाही. त्यामुळे तू शहाणा हो. आणखी माझ्या नादी लागू नको. मी जर मागे लागलो तर तुझी जवळपास २२ पेक्षा जास्त प्रकरणं माझ्याकडे आली आहेत. त्यामुळे तू आणखी शहाणा हो. नाहीतर लय लांब जाशील, अशा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
यावेळी जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंच्या एका खळबळजनक प्रकरणाचा उलगडा केला. आज सकाळी रंजना नागपूरकर नावाची एक नागपूरची महिला माझ्याकडे आली होती. ही सकाळची गोष्ट आहे. म्हणून तू सावध हो. हा मॅटर इतका भयानक आहे. कारण शोभाताई फडणवीस यांच्या बहिणीची मुलगी त्यांच्या घरी दिलेली आहे. हे देवेंद्र फडणवीस यांना माहितीही नसेल. त्यांच्याच पाहुण्यांमध्ये इतकी मोठी फसवणूक झाली हे त्यांना माहितीही नसेल. रंजना प्रदीप नागपूरकर ही महिला माझ्याकडे येऊन इतकी रडत होती, याच टेन्शनमुळे तिचा नवराही मेला आहे, असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान रंजना नागपूरकर यांनी त्यांच्यासोबत मोठी आर्थिक किंवा मालमत्तेची फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे. रंजना नागपूरकर यांच्या दाव्यानुसार, पोलीस दलात कार्यरत असलेल्या त्यांच्या पतीच्या एका प्रकरणाच्या निकालासाठी त्यांनी धनंजय मुंडे यांना १७ लाख रुपये दिले होते. मात्र, पैसे देऊनही त्यांचे काम झाले नाही आणि उलट त्यांना वेळोवेळी मानसिक त्रास देण्यात आला. या प्रकरणातील आर्थिक व्यवहार आणि निर्माण झालेल्या दडपणामुळेच पती प्रदीप नागपूरकर यांचा मृत्यू झाला, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. याशिवाय, पतीच्या मृत्यूनंतर जेव्हा त्या परळी येथे पैसे परत मागण्यासाठी गेल्या होत्या, तेव्हा त्यांना पिस्तूल लावून धमकावण्यात आले. हा सर्व प्रकार मुंडे यांच्या समोरच घडला, असा दावा त्यांनी केला आहे.
[embedded content]
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




