धाराशिव: जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावर गुरुवारी (३ सप्टेंबर २०२६) दुपारी एक अत्यंत मन हेलावणारी आणि हादरवून टाकणारी दुर्घटना घडली. राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटू असलेल्या एका ३० वर्षीय मातेने आपल्या तीन लहान मुलांसह किल्ल्यातील सर्वांत उंच असलेल्या 'उपली बुरुजावरून' सुमारे १५० फूट खोल दरीत उडी मारून टोकाचे पाऊल उचलले. या भीषण दुर्घटनेत माता अश्विनी मनोहर पौळ (वय ३०, रा. अंबुलगा, ता. निलंगा, जि. लातूर) आणि त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य मनोहर पौळ यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्यांच्या अडीच वर्षांच्या जुळ्या मुलींपैकी क्रांती हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, दुसरी जुळी मुलगी वीरा हिची प्रकृती अत्यंत गंभीर असून तिच्यावर धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
नेमकी घटना कशी घडली?
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, अश्विनी मनोहर पौळ या गुरुवारी आपल्या तीन लहान मुलांसह (अजिंक्य, वीरा आणि क्रांती) नळदुर्गचा ऐतिहासिक किल्ला पाहण्यासाठी आल्या होत्या. दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास त्या किल्ल्यातील सर्वांत उंच असणाऱ्या उपली बुरुजावर गेल्या. या बुरुजाची उंची सुमारे १५० फूट इतकी आहे. तेथील एका छोट्या कमानीतून अश्विनी यांनी आपल्या तिन्ही मुलांना सोबत घेऊन थेट खाली दरीत उडी मारली. या भीषण कोसळण्यामुळे अश्विनी आणि मुलगा अजिंक्य यांचा जागीच प्राण गेला, तर दोन्ही जुळ्या मुली गंभीर जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच किल्ल्याचे इन्चार्ज नागनाथ गवळी यांनी तात्काळ नळदुर्ग पोलिसांना याबाबत कळविले.
माहिती मिळताच नळदुर्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक अख्तर सय्यद आणि बीट अंमलदार खलील शेख यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या वीरा आणि क्रांती या दोन्ही जुळ्या मुलींना तात्काळ नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, प्रकृती अधिक चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले, जिथे उपचारादरम्यान एका चिमुरडीचाही मृत्यू झाला.
गेटवर केक कापला आणि घडली दुर्दैवी घटना
या घटनेबाबत एक अत्यंत भावूक माहिती समोर आली आहे. नळदुर्ग किल्ल्यावर येताना अश्विनी यांनी एक केक आणला होता. किल्ल्यावर जाऊन तो केक कापायचा असे त्यांचे नियोजन होते. मात्र, सुरक्षारक्षकाने किल्ल्याच्या आत केक घेऊन जाण्यास नकार दिल्याने, अश्विनी यांनी गडाच्या दरवाज्याजवळच तो केक कापून वाढदिवस साजरा केला. त्यानंतर काही वेळातच त्यांनी हे अत्यंत भयानक आणि टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
पतीच्या सांगण्यावरून सोडली होती नोकरी
मृत अश्विनी पौळ या मूळच्या लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील अंबुलगा येथील असून त्यांचे माहेर उमरगा तालुक्यातील व्हंताळ येथील आहे, त्यांचे वडील शिक्षक आहेत. अश्विनी या मुंबई येथे 'महाराष्ट्र सुरक्षा बल' (MSF) मध्ये नोकरीला होत्या. त्यांचे पती मनोहर पौळ हे रिक्षाचालक आहेत. पती मनोहर यांच्या सांगण्यावरूनच अश्विनी यांनी चार ते पाच महिन्यांपूर्वी आपली मुंबईतील सरकारी नोकरीचा राजीनामा दिला होता. गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून त्या आपल्या तीन मुलांसह माहेरी राहत होत्या.
कौटुंबिक छळाचे गंभीर आरोप
या संपूर्ण प्रकरणामागील नेमके कारण अजून अधिकृतपणे समोर आले नसले, तरी पती आणि सासरच्या मंडळींच्या सततच्या मानसिक व शारीरिक त्रासाला तसेच कौटुंबिक छळाला कंटाळूनच अश्विनी यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप त्यांच्या माहेरच्या मंडळींनी व वडिलांनी केला आहे. नळदुर्ग पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून सर्व बाजूंनी कसून चौकशी सुरू केली आहे. या घटनेमुळे नळदुर्ग किल्ल्यावरील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, संपूर्ण परिसरात व क्रीडा जगतात मोठी शोककळा पसरली आहे.
शहर
- मुंबई: राष्ट्रीय विस्तारासाठी शिंदेंची मोठी रणनीती; देशभरातील १५ राज्यांत शिवसेना वाढवण्याची जय्यत तयारी!
- पुणे: दहीहंडी अन् गणेशोत्सवातील कर्णकर्कश डीजेच्या आवाजाविरोधात नागरिक आक्रमक; शांततेत सण साजरा करण्याची मागणी!
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा एल्गार! बीड आणि सोलापूरकडे जाणारी वाहतूक ठप्प, मराठा क्रांती मोर्चाचा दणदणीत रास्ता रोको!
- मुंबई: अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता आता तुकाराम मुंढेंच्या रडारवर!
महाराष्ट्र
- कोल्हापूर: पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी मोठी कारवाई; २०२७ पर्यंत सर्व एसटीपी प्रकल्प पूर्ण करण्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे कडक निर्देश!
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
- मुंबई: राष्ट्रीय विस्तारासाठी शिंदेंची मोठी रणनीती; देशभरातील १५ राज्यांत शिवसेना वाढवण्याची जय्यत तयारी!
- पुणे: दहीहंडी अन् गणेशोत्सवातील कर्णकर्कश डीजेच्या आवाजाविरोधात नागरिक आक्रमक; शांततेत सण साजरा करण्याची मागणी!
गुन्हा
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
- सांगली: पलूसमध्ये घरगुती वादातून पती-पत्नीचे टोकाचे पाऊल; विषारी औषध प्राशन करून दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: राजकारणात मोठा भूकंप होणार? संजय राऊतांचा मोठा दावा, देवेंद्र फडणवीस होऊ शकतात देशाचे नवे 'उपपंतप्रधान'!
- नवी दिल्ली: 'काॅक्रोच जनता पार्टी'मध्ये उभी फूट! मनीष ब्रह्मभट्ट यांनी 'CJP-डेमोक्रेटिक' पक्षाची केली घोषणा, अरविंद केजरीवाल आणि अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप!
- अयोध्या: राम मंदिरात ऐतिहासिक निर्णय; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओ पदी नियुक्ती
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड


























Subscribe to my channel




