पुणे: पुण्यातील रस्ते अपघातांची वाढती मालिका आणि त्यामुळे होणारे मृत्यू आता अत्यंत चिंतेचा विषय बनले आहेत. पुणे पोलिसांच्या पाहणीतून एक धक्कादायक माहिती समोर आली असून, शहरातील तब्बल १४ वाहतूक विभाग अक्षरशः अपघातांचे 'रेड झोन' ठरले आहेत. या विभागांमधील ३८ अत्यंत धोकादायक अपघातप्रवण ठिकाणांवर म्हणजेच 'ब्लॅक स्पॉट'वर चालू वर्षातील अवघ्या आठ महिन्यांत तब्बल १८५ जणांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, यातील बहुतांश गंभीर आणि प्राणघातक अपघातांमध्ये अवजड वाहनांचा मोठा सहभाग असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.
पुणे शहर आणि लगतच्या उपनगरांमध्ये दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी आणि रस्ते अपघातांची वाढती समस्या लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी संपूर्ण शहरातील अपघातांच्या घटनांचा सविस्तर आढावा घेतला. शहरातील एकूण ३४ वाहतूक विभागांपैकी तब्बल १४ विभागांमध्ये अपघातांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. या विभागांतील प्रमुख रस्ते, धोकादायक वळणे, उड्डाणपुलांचे उतार आणि गर्दीच्या ठिकाणांची पाहणी करून ३८ 'ब्लॅक स्पॉट' निश्चित करण्यात आले आहेत.
पोलिसांनी जाहीर केलेल्या अहवालानुसार, प्रामुख्याने आंबेगाव, बिबवेवाडी, नऱ्हे, बाणेर, लक्ष्मीनगर, वानवडी, मुंढवा, हडपसर, मांजरी, लोणी काळभोर, फुरसुंगी, लोणीकंद, वाघोली आणि खराडी या प्रमुख वाहतूक विभागांमध्ये अपघातांचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. या भागांमध्ये ररस्ते सुरक्षा आणि वाहतुकीचे नियम कठोर करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई
वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे. आगामी काळात ट्रॅफिक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. यादरम्यान ट्रिपल सीट वाहन चालवणे, चुकीच्या दिशेने (राँग साईड) गाडी चालवणे तसेच फॅन्सी नंबर प्लेट लावून फिरणाऱ्या वाहनचालकांवर मोठ्या प्रमाणावर दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. याशिवाय, ई-चलनाद्वारे कारवाई करण्याचे विशेष अधिकार आता पोलीस उपनिरीक्षक आणि त्यावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले आहेत. ब्लॅक स्पॉटवर विशेष लक्ष ठेवणे, वाहतूक नियमन अधिक प्रभावी करणे आणि आवश्यकतेनुसार अतिरिक्त पोलीस मनुष्यबळ तैनात करण्याचे महत्त्वपूर्ण नियोजन पुणे वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे.
शहर
- पुणे: अहिल्यानगर महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात! दुभाजक ओलांडून कार पलटी आणि ट्रकला धडक; वाघोलीतील ३ तरुणांचा मृत्यू, २ जखमी!
- पुणे: पाईट–शिरोली मार्गावर हायवाची स्कूटरला भीषण धडक; दिंडी मंडळाचे अध्यक्ष पोपट रौंधळ यांचा जागीच मृत्यू!
- पुणे: 'एफडीए'चे २ दिवसांत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ९६ ठिकाणी छापे; १२ परवाने निलंबित, ५ आस्थापने बंद करण्याचे आदेश
- पुणे: महापालिकेचा सुट्टीच्या दिवशीही अतिक्रमणावर हातोडा; पुन्हा अतिक्रमण केल्यास दुकाने सील करण्याचा आयुक्तांचा इशारा!
महाराष्ट्र
- पुणे: अहिल्यानगर महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात! दुभाजक ओलांडून कार पलटी आणि ट्रकला धडक; वाघोलीतील ३ तरुणांचा मृत्यू, २ जखमी!
- पुणे: पाईट–शिरोली मार्गावर हायवाची स्कूटरला भीषण धडक; दिंडी मंडळाचे अध्यक्ष पोपट रौंधळ यांचा जागीच मृत्यू!
- कोल्हापूर: महायुतीची १२५ महामंडळे केवळ घोषणांसाठी; सतेज पाटलांचा हल्लाबोल, करवीर आणि कागल तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी!
- रत्नागिरी: गुहागरात शृंगारतळी-आबलोली रस्त्याकडेला आढळले बिबट्याचे मादी पिल्लू; वनविभागाच्या पथकाने केले सुरक्षित रेस्क्यू!
गुन्हा
- यवतमाळ: घाटंजी येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे टोकाचे पाऊल; भाड्याने राहत असलेल्या खोलीत घेतला गळफास, परिसरात खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर सावंगी जवळ भीषण अपघात: चालकाला डुलकी लागल्याने ट्रॅव्हल्स उलटली; दोघांचा मृत्यू, ३० प्रवासी जखमी!
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कोलकाता: 'पश्चिम बंगाल'चे नाव बदलून 'पश्चिम बंग' करण्याची तयारी; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा, विधानसभेत प्रस्ताव मांडणार!
- नवी दिल्ली: बालेन शाह १८ हजार कोटी मागायला आलेले, भारताने दिले २४ हजार कोटींचे पॅकेज; मोदींच्या भेटीनंतर ऐतिहासिक घोषणा आणि 'सरयू-कमल एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा!
- उत्तर प्रदेश: बुलंदशहरमध्ये धक्कादायक घटना! घरापासून ४० मीटर अंतरावरील बंद खोलीत चिमुकलीचा मृतदेह; जादूटोण्याच्या संशयाने खळबळ, संशयित महिला ताब्यात
- गोवा: पुढील वर्षापासून गोव्यात दुसरे मेडिकल कॉलेज, आयटीआयच्या दर्जावाढीसाठी २५० कोटींची तरतूद आणि मुख्यमंत्री चषक मॅरेथॉनचा शुभारंभ!




























Subscribe to my channel



