कोल्हापूर: नात्यातील मुलीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाच्या रागातून जंगमहट्टी येथील १७ वर्षीय तरुणाला पार्ले येथे बोलावून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खून केल्यानंतर मृतदेह तिलारी येथील स्वप्नवेलजवळील दरीत, तर दुचाकी बेळगाव येथे ठेवून संशयितांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी रात्री ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
हर्षद प्रकाश हुंदळेकर (वय १७, रा. जंगमहट्टी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कीर्तीकुमार रामू कुद्रे (वय २८), दिलीप ऊर्फ लहू लक्ष्मण कुट्रे (वय २९) आणि श्रीनाथ मधुकर नागुर्डेकर (वय २४) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बुधवारी रात्री जंगमहट्टी येथील आणखी दोघांना पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षदचे कीर्तीकुमारच्या नात्यातील मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. त्याचा राग मनात धरून कीर्तीकुमारने आठवडाभरापूर्वी इन्स्टाग्रामवर 'कमल खरात' या नावाने बनावट खाते तयार करून हर्षदशी चॅटिंग सुरू केले. शनिवारी रात्री त्याला पार्ले येथे बोलावले. हर्षद मित्र अजय साळुंखे याच्यासोबत तेथे गेला. मात्र, 'तू एकटाच ये' असा संदेश आल्यानंतर अजयला तेथेच थांबवून हर्षद पुढे गेला. तेथे संशयितांनी त्याच्यावर हल्ला केला. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे संशयितांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर मृतदेह चारचाकी वाहनातून स्वप्नवेलजवळील दरीत टाकण्यात आला.
बुधवारी सकाळी पोलिस उपअधीक्षक विवेक पाटील, पोलिस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संशयितांना घटनास्थळी नेऊन शोधमोहीम राबवली. ड्रोन, फॉरेन्सिक पथक व श्वानपथकाच्या मदतीने शोध घेऊनही हर्षद सापडला नाही. पाऊस व अंधुक प्रकाशामुळे मोहीम थांबविण्यात आली. गुरुवारी सावंतवाडी येथील बाबूलाल अलमेडा यांच्या रेस्क्यू टीमकडून शोधमोहीम राबविण्यात येणार आहे.
बेपत्ता तक्रारीवरून शोध
सोमवारी रात्री हर्षद बेपत्ता झाल्याची तक्रार त्याची आई योगिता हुंदळेकर यांनी पोलिसात दिली होती. तक्रारीतील माहितीनुसार पोलिसांनी संशयितांची चौकशी सुरू केली. त्यानंतर तपासाच्या आधारे पोलिसांनी शोधमोहीम राबविली.
सूचना: ही बातमी उपलब्ध माहिती व अधिकृत स्रोतांच्या आधारे प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत तपास व पुढील घडामोडींनुसार माहितीमध्ये बदल होऊ शकतो.
शहर
- पुणे: यंदाच्या उत्सवात पुणेकरांना अनुभवायला मिळणार कामाचा माणूस, अजितदादांच्या प्रशासकीय शैलीवर आधारित लक्षवेधी हलते देखावे!
- नाशिक: रस्त्यावरील चिखलामुळे दुचाकी घसरली, पाठीमागून आलेल्या बसच्या धडकेत विवाहितेचा जागीच मृत्यू
- पुणे: एक मराठा, लाख मराठा च्या गगनभेदी घोषणा; मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ पुण्यातील कात्रज चौकात मराठा समाज आक्रमक, केला रास्ता रोको
- पुणे: जुन्नर तालुक्यातून खळबळजनक बातमी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला आभाटेक जंगलात, परिसरात उडाली मोठी दहशत व शोककळा
महाराष्ट्र
- सातारा: कॉलेज हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून तरुणीचे टोकाचे पाऊल, शिक्षुता वर्तुळात व महाविद्यालयात शोककळा!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- पुणे: हो, आमच्याकडून चुका झाल्या, आवाज आणि स्पर्धा वाढली, आता नियमांचे पालन करू गणेशोत्सवापूर्वी पुणे साऊंड व्यावसायिकांची मोठी कबुली!
- पुणे: यंदाच्या उत्सवात पुणेकरांना अनुभवायला मिळणार कामाचा माणूस, अजितदादांच्या प्रशासकीय शैलीवर आधारित लक्षवेधी हलते देखावे!
गुन्हा
- सांगली: पलूसमध्ये घरगुती वादातून पती-पत्नीचे टोकाचे पाऊल; विषारी औषध प्राशन करून दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड
- उत्तराखंड: पूर आलेली नदी पार करताना हातातून निसटली चिमुकली, लेकीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात मारली उडी अन् दोघींचाही मृत्यू
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला
- पश्चिम बंगाल: ममता बॅनर्जींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर! भाचीचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू; नोकरी गेल्यामुळे आणि घटस्फोटाच्या प्रकरणामुळे होती तणावात



























Subscribe to my channel




