नाशिक: शहरात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेले अपघातांचे सत्र अद्यापही थांबलेले नाही. बुधवारी (दि. २) त्र्यंबकरोडवरील पपया नर्सरीजवळ रस्ता कामामुळे झालेल्या चिखलामुळे एक दुचाकी अचानक घसरली आणि त्याचवेळी पाठीमागून आलेल्या एका खासगी बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार विवाहिता जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
काय आहे नेमकी घटना? पेठ तालुक्यातील खोपोली गावचे रहिवासी असलेले एक तरुण दांपत्य बुधवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास दुचाकीने (क्र. एम.एच. १५ जीजी १८९२) नाशिकमार्गे त्र्यंबकेश्वरच्या दिशेने जात होते. फिर्यादी शामवेल काशीराम इंपाळ (३२) हे दुचाकी चालवत होते, तर त्यांची पत्नी प्रतीक्षा राजकुमार आवारी (२६, रा. खोपोली, पेठ) या मागे बसल्या होत्या. त्र्यंबकरोडवरील पपया नर्सरीजवळ रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणावर चिखल साचला होता. रस्त्यावरील या चिखलाचा चालकाला अंदाज आला नाही, ज्यामुळे त्यांची दुचाकी अचानक घसरली.
बसच्या चाकाखाली सापडल्याने जागीच मृत्यू: दुचाकी घसरल्यानंतर पाठीमागून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या एका खासगी बसच्या (क्र. एम.एच. १५ एच.एच ६०७१) चालकाने रस्त्याच्या बिकट परिस्थितीकडे दुर्लक्ष केले आणि वेगात असलेल्या बसने दुचाकीला जोरदार धडक देत फरफटत नेले. या अपघातात दुचाकीवरील विवाहिता प्रतीक्षा इंपाळ या बसच्या पुढील चाकाखाली सापडल्या. डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्या जागीच गतप्राण झाल्या.
पोलिसांची कारवाई: अपघाताची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले. या प्रकरणी सातपूर पोलिसांनी बसचालक संशयित बाळासाहेब पवार (६५, रा. मखमलाबाद) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या व मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील कायदेशीर तपास सुरू आहे.
आजीला भेटण्याची इच्छा राहिली अर्धवट: शामवेल आणि प्रतीक्षा हे पेठवरून दुचाकीने नाशिकला आले होते. तिथून ते त्र्यंबकेश्वर जवळील काचुर्ली गावी आपल्या आजीला भेटण्यासाठी निघाले होते. मात्र, रस्त्यातच काळाने घाला घातल्यामुळे प्रतीक्षाची आजीला भेटण्याची इच्छा कायमची अर्धवट राहिली. तिच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर व गावावर शोककळा पसरली असून तिच्या पश्चात आई, वडील, पती आणि भाऊ असा परिवार आहे.
फार्मासिस्ट होण्याचे स्वप्न भंगले: मृत प्रतीक्षा ही फार्मसीचे (Pharmacy) शिक्षण घेत होती आणि भविष्यात एक यशस्वी फार्मासिस्ट बनण्याचे तिचे मोठे स्वप्न होते. ती अभ्यासात अत्यंत हुशार होती. तिचा पती शामवेल हादेखील शहरातील पंचवटी परिसरातील एका महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण घेत असून, पालघर येथील एका खासगी कंपनीत नोकरी करून कुटुंबाचा आर्थिक उदरनिर्वाह चालवत होता. पती तिला उच्च शिक्षणासाठी सतत प्रोत्साहन देत असे. मात्र, एका दुर्दैवी अपघाताने या तरुण कुटुंबाचे हसते-खेळते विश्व उद्ध्वस्त केले आहे.
शहर
- पुणे: मध्य भागात दिवाळी खरेदीसाठी नागरिकांची तुफान गर्दी; वाहतूक नियोजन अन् चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त
- मुंबई: सणासुदीच्या तोंडावर मोठी कारवाई: महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाकडून तब्बल ९ कोटी रुपयांचा खाद्य साठा जप्त; पतंजली तुपासह १९ जणांचे परवाने निलंबित
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- पुणे: बारामतीत ढगफुटीसदृश पाऊस; एकाच रात्रीत महिनाभराची सरासरी ओलांडत कोसळल्याने शहर आणि परिसरात जलमय परिस्थिती
महाराष्ट्र
- अमरावती: प्लास्टिक कचऱ्यापासून धागे बनवणाऱ्या पर्यावरणपूरक यंत्राला केंद्र सरकारचे पेटंट; विदर्भातील संशोधकांची ऐतिहासिक कामगिरी
- जळगाव: 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतून महिलांना मोफत सूर्यचूल मिळणार का? सोशल मीडियावरील व्हायरल दाव्यामागचे सत्य उघड
- पुणे: मध्य भागात दिवाळी खरेदीसाठी नागरिकांची तुफान गर्दी; वाहतूक नियोजन अन् चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त
- मुंबई: सणासुदीच्या तोंडावर मोठी कारवाई: महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाकडून तब्बल ९ कोटी रुपयांचा खाद्य साठा जप्त; पतंजली तुपासह १९ जणांचे परवाने निलंबित
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ
- बंगळुरू: पंचतारांकित हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये विजेचा धक्का लागून दोन परदेशी पर्यटकांचा मृत्यू; वाचवताना दोघे जण गंभीर जखमी


























Subscribe to my channel




