सांगली: पलूसमध्ये घरगुती वादातून पती-पत्नीचे टोकाचे पाऊल; विषारी औषध प्राशन करून दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू

सांगली: पलूस शहरातील गंजीखाना परिसरात घरगुती वादातून पती-पत्नीने विषारी औषध प्राशन करून जीवन संपवल्याने खळबळ उडाली आहे. बाळासाहेब मुरलीधर कदम (वय ५८) यांचा सोमवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी दुपारी २.३०च्या सुमारास राहत्या घरी मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी उषा बाळासाहेब कदम (वय ४६) यांचा उपचार सुरू असताना मंगळवारी, दि. १ सप्टेंबर रोजी सकाळी ६.४५च्या सुमारास सांगली सिव्हिल रुग्णालयात मृत्यू झाला.


याबाबत त्यांचा मुलगा अजय कदम (वय २८, व्यवसाय: एमआयडीसीतील खासगी नोकरी, सध्या रा. कागल, जि. कोल्हापूर) यांनी माहिती दिली. प्राथमिक माहितीनुसार, दोघांनी विषारी औषध प्राशन केल्याचा संशय असून, या दुहेरी मृत्यूमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, घरगुती वादातून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. अजय कदम हा आई-वडिलांपासून विभक्त होऊन कागल येथे राहतो. बाळासाहेब व उषा कदम हे दोघेच पलूस येथे राहत होते. ३० ऑगस्ट रोजी घरगुती कारणावरून दोघांमध्ये वाद झाला असावा. त्यानंतर उषा यांनी विषारी औषध प्राशन केले. त्यांना स्थानिकांच्या मदतीने पलूस ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

 

दरम्यान, पत्नीची प्रकृती गंभीर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी बाळासाहेब यांनीही विषारी औषध प्राशन केले. अजय याच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर बाळासाहेब यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते बेशुद्ध अवस्थेत होते व त्यांच्या तोंडातून फेस येत होता. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. उषा कदम यांची प्रकृतीही गंभीर असल्याने ३१ ऑगस्ट रोजी दुपारी १२.२२ वाजता त्यांना पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान १ सप्टेंबर रोजी सकाळी ६.४५ वाजता त्यांचा मृत्यू झाला. दोन्ही मृत्यूंची नोंद पलूस पोलिस ठाण्यात झाली असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक जयसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार रूपाली कुरणे तपास करीत आहेत.

दुहेरी मृत्यूमागे नेमके कारण काय?
पतीचा घरात मृत्यू आणि त्यानंतर पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. दोघांनी विषारी औषध कोणत्या परिस्थितीत घेतले, त्यामागे कौटुंबिक, आर्थिक, वैयक्तिक अथवा अन्य कारण होते का, याचा तपास सुरू आहे. बाळासाहेब यांच्या मृत्यूच्या ठिकाणी आढळलेला पांढऱ्या द्रवाचा अंश व उग्र वास, तसेच उषा यांनी विषारी औषध घेतल्याची नोंद यामुळे दोन्ही मृत्यूंचा परस्पर संबंध तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे. शवविच्छेदन अहवाल आणि पोलिस तपासानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *